मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना दुसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ

केंद्र सरकारने संजय बर्वे यांना तीन महिन्यांसाठी अतिरिक्त मुदतवाढ दिली (Mumbai CP Sanjay barve get extension) आहे. नुकतंच याबाबतच पत्रक केंद्र सरकारने काढलं आहे.

Mumbai CP Sanjay barve get extension, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना दुसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांचा कार्यकाळ उद्या (30 नोव्हेंबर) संपत (Mumbai CP Sanjay barve get extension) आहे. त्यामुळे संजय बर्वे यांना पुन्हा मुदतवाढ मिळणार की मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण केंद्र सरकारने संजय बर्वे यांना तीन महिन्यांसाठी अतिरिक्त मुदतवाढ दिली (Mumbai CP Sanjay barve get extension) आहे. नुकतंच याबाबतच पत्रक केंद्र सरकारने काढलं आहे. दरम्यान यापूर्वीही बर्वे यांना तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली (Mumbai CP Sanjay barve get extension) होती.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची पोलिस महासंचालक म्हणून बढती केल्यानंतर पोलिस आयुक्त हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर 28 फेब्रुवारीला संजय बर्वे यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. संजय बर्वे हे 31 ऑगस्टला सेवानिवृत्त होणार होते. मात्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत उद्या (30 नोव्हेंबर) संपत आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांसारख्या महत्त्वाच्या पदावर सेवाज्येष्ठता आणि अन्य निकषांनुसार नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात. सर्वोच्च आणि उच्च् न्यायलयाच्या आदेशानुसार तीन किंवा पाच अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस गृहखात्याकडून केली जाते आणि त्यातील एकाची निवड मुख्यमंत्र्यांकडून केली (Mumbai CP Sanjay barve get extension) जाते.

मात्र राज्यात दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. राष्ट्रपती राजवटीत ही प्रक्रिया करुन राज्यपालांना नवीन अधिकाऱ्याची निवड करावी लागते. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्या या पदावर नियुक्ती होईल, त्या पदावरही वेगळ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागेल. हे सर्व टाळण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान सध्या मुंबईच्या नवीन पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत डॉ. के. व्यंकटेशम, रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह यांची नावे चर्चेत आहे. यामुळे तीन महिन्यानंतर मुंबईला नवे पोलिस आयुक्त कोण मिळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *