महानगरपालिकेचा पवई तलाव भरुन वाहू लागला; तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 किलोमीटर; 1890 मध्य बांधकाम

| Updated on: Jul 05, 2022 | 10:44 PM

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 27 किलोमीटर (सुमारे 17मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम 1890 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या तलावाला महत्वाचे मानले जाते.

महानगरपालिकेचा पवई तलाव भरुन वाहू लागला; तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 किलोमीटर; 1890 मध्य बांधकाम
Follow us on

मुंबईः मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव (Pawai lake) आज (दि.5) सायंकाळी वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 545 कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे नागरिकांसाठी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी हे पाणी वापरले जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू (lake Overflow) लागला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.

तलावाचे बांधकाम 1890 मध्ये पूर्ण

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 27 किलोमीटर (सुमारे 17मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम 1890 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या तलावाला महत्वाचे मानले जाते.
या तलावाची निर्मिती करण्यात आली होती, त्यावेळी या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला होता.

पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 किलोमीटर

या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 2.23 चौरस किलोमीटर एवढे असल्याचेही सांगण्यात आले.

तलावामध्ये 545.5 कोटी लीटर पाणी

तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये 545.5 कोटी लीटर पाणी असते. (5455 दशलक्ष लिटर) एवढी क्षमता आहे. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळत असल्याचेही सांगण्यात आले.