‘राज ठाकरेंची भेट आणि प्रश्न सुटला’, राज्य सरकारकडून पेस्ट कंट्रोल आणि फवारणी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय

| Updated on: May 05, 2021 | 4:07 PM

राज ठाकरेंच्या भेटीनंतर इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनचा प्रश्न सुटल्याने त्यांनी भेट घेऊन मनसे अध्यक्षांचे आभार मानले.

राज ठाकरेंची भेट आणि प्रश्न सुटला, राज्य सरकारकडून पेस्ट कंट्रोल आणि फवारणी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय
Follow us on

मुंबई : तसं पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे ना कोणतं मंत्रालय ना कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार. मात्र, तरीही राज्यभरातील अनेक लोक आपले प्रश्न घेऊन राज ठाकरेंची भेट घेतात. त्यांच्यासमोर आपलं गाऱ्हाणं मांडतात आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी विनंती करतात. यानंतर संबंधित लोकांचे अनेक प्रश्न सुटतात. यावेळीही राज ठाकरेंच्या भेटीनंतर इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनलाही असाच अनुभव आला. राज्य सरकारने कोरोना नियंत्रणासाठी कठोर निर्बंध लादले. यात केवळ अत्यावश्यक सेवांना सवलत देण्यात आली. मात्र, अत्यावश्यक सेवांमध्ये पेस्ट कंट्रोल आणि फवारणी कर्मचाऱ्यांचा समावेश नसल्याने या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलं. अखेर पेस्ट कंट्रोल असोसिएशनने राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांचा प्रश्न सुटला. म्हणूनच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आज राज ठाकरेंची भेट घेत त्यांचे आभार मानले (Pest control association thanks to Raj Thackeray for his help).

संचार बंदीच्या काळात पेस्ट कंट्रोल आणि औषध फवारणी करणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना आपत्कालीन सेवेमध्ये प्रतिबंध करण्यात आले होते. आपत्कालीन सेवांमध्ये पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे या मागणी संदर्भात इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी असोसिएशनचा हा प्रश्न समजून घेतला. तसेच कोरोनाच्या काळात लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्जंतूक फवारणी झाली पाहिजे. त्यासाठी पेस्ट कंट्रोलच्या कर्मचाऱ्यांना आपत्कालीन सेवेमध्ये सामावून घ्यावे अशी मागणी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे केली.

राज ठाकरे यांनी स्वतः संबंधित खात्याच्या मंत्र्यांना फोन करून पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांना आपत्कालीन सेवांमध्ये सामावून घ्यावे, अशी सूचना केल्यानंतर मंत्रालय स्तरावर चक्र फिरली आणि पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत सामावून घेण्यात आलंय. राज ठाकरेंच्या सूचनांचा विचार करून राज्य सरकारने पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांना आपत्कालीन सेवामध्ये सामावून घेतल्याने आज (5 मे) इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशच्या शिष्टमंडळाने कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. तसेच त्यांना आभाराचे पत्र देत कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा :

संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव, राज्यांच्या स्वायत्तेसाठीचा आग्रही आवाज तुम्ही बनाल : राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले, विरारची घटना क्लेशदायक; पण…

कोरोनाविरुद्धची ही लढाई मोठी, 100 वर्षातलं मोठं आरोग्य संकट, एकत्र येऊन लढू; रेमडेसिव्हीरवरुन राज ठाकरेंचं नरेंद्र मोदींना पत्र

व्हिडीओ पाहा :

Pest control association thanks to Raj Thackeray for his help