AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; पेट्रोल पंपांकडे ग्राहकांनी फिरवली पाठ

मुंबईत पेट्रोलचा आजचा दर 95.46 तर डिझेलचा दर 86.34 इतका आहे. गेल्या 24 तासांत पेट्रोल 25 आणि डिझेल 30 पैशांनी महागले आहे. तर पॉवर पेट्रोलचा दरही 98.24 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. | Petrol and diesel

पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; पेट्रोल पंपांकडे ग्राहकांनी फिरवली पाठ
पेट्रोल आणि डिझेल
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 15, 2021 | 8:49 AM
Share

मुंबई: देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol and Diesel) दर गगनला भिडत असल्याने लोकांचा खिसा खाली होत आहे. त्यामुळे आता मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरातही लोक वाहनांनी प्रवास करताना दहावेळा विचार करत आहेत. पेट्रोलचा दर परवडत नसल्याने गाड्या बाहेर काढायच्या की नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याने आता बरेच ग्राहक पेट्रोलची खरेदी टाळत असल्याचे पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. (Petrol and diesel rates)

मुंबईत पेट्रोलचा आजचा दर 95.46 तर डिझेलचा दर 86.34 इतका आहे. गेल्या 24 तासांत पेट्रोल 25 आणि डिझेल 30 पैशांनी महागले आहे. तर पॉवर पेट्रोलचा दरही 98.24 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

पेट्रोल पंप चालकांवरही पेट्रोल विक्री बंद करण्याची वेळ

प्रीमियम पेट्रोलचा दर शंभरीपार गेल्याने पेट्रोल पंपचालकांना एका नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. राज्यात अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर अजूनही जुन्याच मशीन्स वापरल्या जात आहेत. या मशिन्समध्ये तीन अंकी किंमत दर्शविण्याची सुविधा नसल्यामुळे (100 पेक्षा जास्त) पंपचालकांना पेट्रोल विक्री थांबवावी लागली. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि राजस्थानात प्रीमियम पेट्रोलचा दर 100 रूपयांच्या पुढे गेला आहे.

राज्यातील पेट्रोलचा दर ?

परभणी 97.59 मुंबई 95.46 कोल्हापूर 95.60 नाशिक 95.82 पुणे 95.12 गुहागर 96.81 हिंगोली 96.35 जळगाव 96.52 औरंगाबाद 96.62

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशाप्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol rate at 100 in many cities old pumps can not display 3 digits price)

संबंधित बातम्या:

27 रुपयांचे पेट्रोल तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत 83 रुपयांचे कसे होते?

Petrol and Disel price: जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचा आजचा दर

(Petrol and diesel rates)

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी