पुढील वर्षांपासून मेट्रो – 9 चालू करण्याची योजना, कुठून कूठपर्यंत करता येणार प्रवास

मीरा-भाईंदरला जाणारी मेट्रो - 9 चा पहीला टप्पा पुढच्या वर्षीपासून सुरू होणार आहे. या मार्गिकेला पुढे उत्तनपर्यंत जोडण्याची योजना आहे.

पुढील वर्षांपासून मेट्रो - 9 चालू करण्याची योजना, कुठून कूठपर्यंत करता येणार प्रवास
METRO -9
Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 25, 2023 | 10:45 AM

मुंबई : मीरा-भाईंदरला जाणारी मेट्रो – 9 चा पहिला टप्पा पुढच्या वर्षांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. 10.58 किलोमीटरच्या या मार्गिकेमुळे मुंबईला मीरा-भाईंदराला केवळ जोडलेच जाणार नसून मुंबईचे प्रवेशद्वार मानले जाणाऱ्या दहीसर नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. दरम्यान या मार्गिकेवरील मेदेतिया नगर या तीन मजली मेट्रो स्थानकाचे काम 63.63 % पूर्ण झाले आहे. ही मार्गिका पुढे एक ते दीड किमीचा मार्ग बांधून उत्तनला जोडण्याची योजना आहे.

हा प्रकल्पाचे दोन टप्पे आहेत, दहीसर ( पू.) ते काशीगाव आणि तर दुसरा टप्पा सुभाषचंद्र बोस स्टेडीयमपर्यंत असणार आहे. ही मार्गिका पुढे एक ते दीड किमीचा मार्ग बांधून उत्तनला जोडण्याची योजना आहे. तसेच येथे आणखी एक कारशेड बांधण्याची योजना आहे.
आम्ही काशीगावपर्यंत जाणारा पहिला टप्पा जरी सुरू केला तरी प्रवाशांना मेट्रो मार्गिका – 7 दहीसर स्थानकाशी कनेक्टीविटी मिळणार आहे. या मार्गिकेचा पहीला टप्पा सुरू करण्यासाठी एमएमआरडीला तीन ते चार गाड्यांची गरज आहे. संपूर्ण कॉरीडॉर डिसेंबर 2025  पर्यंत सुरू होणार आहे. या मार्गिकेला सुरू केल्यानंतर मीरारोड आणि काशीमीरा येथील प्रवाशांना फायदा होणार असून त्यांना सध्याच्या लाईन-7  आणि लाईन – 2 ( अ ) मुळे थेट अंधेरी पूर्व आणि पश्चिम पर्यंत थेट कनेक्टीवीटी मिळणार आहे. तसेच दहीसर चेक नाक्यावरील कोंडी देखील दूर होणार आहे.

मेट्रो मार्ग – 9 चे मेदेतीया नगर मेट्रो स्थानक हे तीन मदल्याचे ( टियर्सचे ) आहे.  ज्यामध्ये पहिल्या मजल्यावर वाहनांसाठी उड्डाणपूल असणार आहे, तर कॉन्कोर्स लेव्हल दुसऱ्या मजल्यावर असेल आणि प्लॅटफॉर्म हे तिसऱ्या मजल्यावर असणार आहे. या स्थानकाची एकूण उंची रस्त्याच्या पातळीपासून 35 मीटर आहे. या  स्टेशनचे बांधकाम  63.63 % पूर्ण झाले आहे.

आठ उन्नत स्थानकांचा समावेश 

मुंबई मेट्रो मार्ग – 9 ही मुंबई उपनगरांना मीरा-भाईंदर शहराला सोबत जोडणारी 10.08 किमीची मार्गिका आहे. ज्यामध्ये 8 उन्नत स्थानकांची समावेश असेल. या मेट्रो मार्ग – 9  ही मेट्रो – 7 चा उत्तरेकडील विस्तार आहे. ही मेट्रो मार्गिका इतर मेट्रो मार्गिकांपेक्षा वेगळी आहे, कारण या मेट्रो मार्गिकेत दोन आंतरबदल ( एक्सचेंज )  मेट्रो स्थानके असणार आहेत. पहिलं आंतरबदल स्थानक हे दहिसर असेल. जिथून मेट्रो मार्ग -7  साठी आणि मेट्रो मार्ग – 2 (अ )साठी आंतरबदल करता येईल आणि दुसरे स्थानक मिरागाव मेट्रो स्थानक हे असेल जिथून मेट्रो मार्ग – 10  सोबत आंतरबदल करता येईल.