आपल्या यंग टॅलंटला मानवताविरोधी विचारांपासून वाचवलं पाहिजे; मोदींचं आवाहन

आज आपल्या युवा विचाराला मानवताविरोधी विचारापासून वाचवले पाहिजे. व्हेव्स हे काम करू शकणार आहे. हे व्यासपीठ आपल्या क्रिएटर्सला ग्लोबल स्टोरी टेलर्सशी जोडणार आहे. आपल्या एनिमेटर्सला ग्लोबल व्हिजनरीशी जोडणार आहे. ग्लोबल चॅम्पियन बनवणार आहे.

आपल्या यंग टॅलंटला मानवताविरोधी विचारांपासून वाचवलं पाहिजे; मोदींचं आवाहन
नरेंद्र मोदी
| Updated on: May 01, 2025 | 1:54 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईत आयोजित वर्ल्ड ऑडियो व्हिजुअल अँड एंटरटेनमेंट समिटचे (WAVES 2025) उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मानवताविरोधी विचाराकडे जाणाऱ्या युवा पिढीबाबत महत्वाचे वक्तव्य केले. युवा पिढीला मानवता विरोधी विचारांपासून वाचवले पाहिजे. ही जबाबदारी आपण घेतली (व्हेव्स) पाहिजे. या जबाबदारीतून मागे फिरलो तर युवा पिढीसाठी ते धोकादायक ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

‘न्यूज 9 ‘ने WAVES Edition ग्लोबल समिटचे आयोजन केले आहे. मुंबईतील जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित या शिखर परिषदेत ते बोलत होते.  व्हेव्स परिषदेत १०० हून अधिक देशांतील कलाकार, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकत्र आले आहेत. त्यांच्यासमोर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आज आपल्या युवा विचाराला मानवताविरोधी विचारापासून वाचवले पाहिजे. व्हेव्स हे काम करू शकणार आहे. हे व्यासपीठ आपल्या क्रिएटर्सला ग्लोबल स्टोरी टेलर्सशी जोडणार आहे. आपल्या एनिमेटर्सला ग्लोबल व्हिजनरीशी जोडणार आहे. ग्लोबल चॅम्पियन बनवणार आहे. यामुळे जागतिक स्तरावर असलेल्या सर्व क्रिएटर्सला मी आमंत्रित करतो. तुम्ही भारताला तुमचे कंटेंट प्लेग्राआऊंड बनवा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, क्रिएटिव्हिटीच्या जगातील दिग्गजांसमोर मी आणखी एक विषय मांडतो. हा विषय क्रिएटिव्ह रिस्पॉन्सिबिलीटीचा विषय आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तंत्रज्ञानाची भूमिका वाढत आहे. यावेळी मानवीय संवेदना कायम ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. हे प्रयत्न क्रिएटिव्ह जग करणार आहे. मानवाचे जीवन आपणास यांत्रिक करायचे नाही. त्याला संवेदनशील आणि समृद्ध करायचे आहे. व्यक्तीची ही समृद्धी माहितीच्या जगातून येणार आहे. त्यासाठी गीत, संगीत, कला, नृत्याला महत्त्व द्यावे लागणार आहे, असे मोदी यांनी सांगितले.

ग्लोबल एनिमेशन मार्केट आता ४३० मिलियन डॉलरवर गेला आहे. येत्या काळात हे वाढणार आहे. त्यामुळे भारताच्या एनिमेशन आणि ग्राफिक्ससाठी ही खूप मोठी संधी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.