AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवान शंकराचे डमरु, श्रीकृष्णची बासरी, विष्णूचा शंख ध्वनी सकारात्मक ऊर्जा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली भारतीय संगीताची परंपरा

जगात अनेक समाज आणि देशाची आपआपली सभ्यता आहे. यामुळे जगभरातील विचारांचा सन्मान करायला हवा. शंभर पेक्षा जास्त देशांत भारताचे चित्रपट प्रदर्शित होत आहे. मोठ्या संख्येने जगभरातील लोक भारतीय चित्रपट पाहत आहे.

भगवान शंकराचे डमरु, श्रीकृष्णची बासरी, विष्णूचा शंख ध्वनी सकारात्मक ऊर्जा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली भारतीय संगीताची परंपरा
नरेंद्र मोदी
| Updated on: May 01, 2025 | 1:21 PM
Share

भारतात नाद ब्रह्माची कल्पना आहे. आपले ईश्वरही संगीत आणि नृत्याने अभिव्यक्त करतात. भगवान शंकराचे डमरू सृष्टीचा पहिला ध्वनी आहे. माता सरस्वतीची विणा विवेक आणि विद्येची लय आहे. भगवान श्रीकृष्णची बासरी प्रेम आणि सौंदर्याचा अमर संदेश देत आहे. परमात्मा विष्णू यांचा शंख ध्वनी सकारात्मक ऊर्जेचे आवाहन आहे, अशी भारतीय संगीताची यशोगाथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मांडली.

न्यूज 9 ने WAVES Edition ग्लोबल समिटचे आयोजन केले आहे. मुंबईतील जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित या शिखर परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत वर्ल्ड ऑडियो व्हिजुअल अँड एंटरटेनमेंट समिटचे (WAVES 2025) उद्घाटन केले. चार दिवस हे समिट चालणार आहे. या समिटच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडे असलेल्या ज्ञान, विज्ञान, सांगीत याच्या वैभवाचा आढावा घेताना सांगितले की, भारताकडे हजारो वर्षांचे खजिना आहे. हा खजिना जागतिक आहे. त्यात विज्ञान आहे. त्यात कथा आहे. गाथा आहेत. भारताचा हा खजिना खूप मोठा आहे. त्याला जगाच्या सर्व भागात घेऊन जाणे गरजेचे आहे. नवीन पिढीसमोर हा खजिना वेगळ्या पद्धतीने मांडायला हवे.

ऑरेंज इकोनॉमी ही संकल्पना मांडताना पंतप्रधान नरेंद्र म्हणाले की, जगात अनेक समाज आणि देशाची आपआपली सभ्यता आहे. यामुळे जगभरातील विचारांचा सन्मान करायला हवा. शंभर पेक्षा जास्त देशांत भारताचे चित्रपट प्रदर्शित होत आहे. मोठ्या संख्येने जगभरातील लोक भारतीय चित्रपट पाहत आहे. भारतात ऑरेंज इकोनॉमीचा उदय काल आहे. कंटेट, क्रिएटिव्हीटी आणि कल्चर हे ऑरेंज इकोनॉमीचे तीन स्तंभ आहेत.

बदलणाऱ्या तंत्रज्ञानावर मार्मिक भाष्य करताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले, स्क्रिन साईज लहान होत आहे. परंतु त्याची व्याप्ती वाढत आहे. त्यातून जाणारा संदेश व्यापक झाला आहे. भारतीय खाद्यपदार्थ जगाची पसंत होत आहे. भारताचे गाणेही जगाची ओळख बनत आहे. भारत फिल्म प्रोडक्शन, संगीत, फॅशनचा ग्लोबल हब होत आहे. आपणास मानवाला रोबर्ट नव्हे तर संवेदनशील आणि समृद्ध करायचे आहे. व्यक्तीची ही समृद्धी माहिती जगताच्या पर्वतातून येणार नाही. त्यासाठी आपल्याला गीत, संगीत, कला, नृत्याला महत्त्व द्यावे लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.