उद्धव ठाकरेंना महाबळेश्वर फिरायला वेळ, आमच्यासाठी नाही, बेरोजगार मराठा तरुणांचा मातोश्रीसमोर आत्मदहनाचा इशारा

| Updated on: Feb 02, 2020 | 2:04 PM

सकल मराठा समाजाच्या बेरोजगार तरुणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोकरीच्या नियुक्तीचा मार्ग निकाली न काढल्यास मातोश्रीसमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे (Protest of Maratha Youth for Job).

उद्धव ठाकरेंना महाबळेश्वर फिरायला वेळ, आमच्यासाठी नाही, बेरोजगार मराठा तरुणांचा मातोश्रीसमोर आत्मदहनाचा इशारा
Follow us on

मुंबई : सकल मराठा समाजाच्या बेरोजगार तरुणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोकरीच्या नियुक्तीचा मार्ग निकाली न काढल्यास मातोश्रीसमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे (Protest of Maratha Youth for Job). मागील 6 दिवसांपासून हे तरुण आझाद मैदानात आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत. मात्र, अद्याप कुणीही दखल न घेतल्याने त्यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला (Protest of Maratha Youth for Job).

2014 मध्ये 50 ते 55 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली होती. 3700 तरुण-तरुणींनी परिक्षा उत्तीर्ण केली. मात्र, आजपर्यंत या तरुणांना नियुक्ती मिळाली नाही. 5 वर्षांपासून पात्र होऊनही नियुक्ती न मिळाल्याने अखेर या तरुणांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अनेकदा पाठपुरावा केला, अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या तरी प्रश्न सुटला नाही. या तरुणांचं वय वाढत असून ज्यासाठी पात्र झाले आहेत त्यासाठीची किमान वयोमर्यादा ओलांडण्याचा धोकाही या तरुणांसमोर आहे. त्यामुळे त्यांना आपल्या हक्काच्या नोकऱ्यांना मुकावं लागणार आहे.

आंदोलक म्हणाले, “शासनातील काही लोक मुद्दामहून आम्हाला त्रास देत आहेत. आजपर्यंत केवळ बैठकीवर बैठका होत आहेत. मात्र, निर्णय होत नाही. आम्ही घर सोडून फक्त नोकरीचा प्रश्न सुटावा म्हणून इथं आलो आहोत. आता जर आमची दखल घेतली नाही, तर आम्ही थेट मातोश्रीवर जाऊ. त्याशिवाय हे ठिकाणावर येणार नाहीत. जर इथं कुणी आत्महत्या केली, तोडफोड झाली, जाळपोळ झाली तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.”

व्हिडीओ: