AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इसिस प्रकरणात पुणे, मुंबईसह देशभरात NIA ची मोठी कारवाई, इसिसचे नेटवर्क…

NIA raids in Maharashtra: राष्ट्रीय तपास संस्थेने पुण्यातून अटक केलेल्या अतिरेक्यांच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळाली होती. त्यानंतर शनिवारी सकाळीच एकाच वेळी ४१ ठिकाणी छापे टाकण्यात आले. इसिसचे देशभरातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.

इसिस प्रकरणात पुणे, मुंबईसह देशभरात NIA ची मोठी कारवाई, इसिसचे नेटवर्क...
nia
| Updated on: Dec 09, 2023 | 8:47 AM
Share

पुणे | 9 डिसेंबर 2023 : राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरात छापे टाकले आहे. पुणे, मुंबई, ठाण्यासह देशभरातील ४१ ठिकाणी कारवाई सुरु केली आहे. इसिस प्रकरणात एकाच वेळी देशभर ही कारवाई करण्यात आली. इसिस प्रकरण पुण्यातून उघड झाले होते. पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. एका मोटारसायकल चोरी प्रकरणातील हे आरोपी होते. त्यानंतर इसिस मॉड्यूलचा धक्कादायक खुलासा झाला. या प्रकरणाचा तपास एटीएसने सुरु केला होता. त्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती पाहून तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) कडे देण्यात आला. आता शनिवारी एनआयएनने पुणे, ठाणे, मिरा भाईंदर परिसरात धाडी टाकल्या.

एकाच वेळी छापेमारी…इसिसचे नेटवर्क उद्ध्वस्त

राष्ट्रीय तपास संस्थेला अटक केलेल्या अतिरेक्यांच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळाली. त्यानंतर इसिसचे देशभरातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. पुणे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, मीरा भाईंदर यासह कर्नाटकात कारवाई केली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये भिवंडीतील पडघात कारवाई सुरु आहे. एकूण ठाणे ग्रामीणमधील ३९ ठिकाणी कारवाई करण्यात आली. पुणे शहरात दोन ठिकाणी कारवाई सुरु आहे. या कारवाईत काही लोकांना ताब्यात घेतले आहे. भिवंडीच्या पडघ्यामुळे काही दिवसांपूर्वी एनआयने कारवाई केली होती.

एनएनएनला मोठे यश

एनआयएने छापेमारी दरम्यान अतिरेक्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, इसिसचे हँडलर्स या सर्वांचा पर्दाफाश केला आहे. देशभरात दहशवादी कारवाया करण्याचा कट उद्ध्वस्त केला आहे. देशात इसिसची विचारधारा रुजवण्याचा डाव या अतिरेक्यांनी आखला होता. पुणे शहरातून हे नेटवर्क चालत होते. या नेटवर्कमधील सहभागी अतिरेक्यांनी आयईडी तयार केले होते. पुणे शहरातील कोंढव्यामधील एका घरात आयईडी असेंबल केले होते. तसेच या दशतवाद्यांनी साताऱ्याच्या जंगलात त्याची चाचणी केली होती.  या प्रकरणात मोहम्मद शहनवाज ऊर्फ शफी जुम्मा आलम अब्दुल्ला, रिजवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख डायपरवाला आणि तालाह लियाकत खान यांना अटक केल्यानंतर एनआयएला धक्कादायक माहिती मिळाली होती.

ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.