
एकनाथ खडसे आणि वाद हा जणू पर्यायी शब्द झाला आहे. राजकीय मुत्सद्देगिरी, मुरलेला राजकारणी, कधी काळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत असलेला नाथाभाऊंचा चेहरा सध्या विविध आव्हानांना तोंड देत आहे. संकट जणू त्यांच्या पाठीमागं हात धुवून लागली आहे. या सकंटांना खडसवण्याचे कसब त्यांना अंगभूतच आहे. ज्या भाजपाचे ते कधीकाळी चेहरा होते, त्याच पक्षातून त्यांना परागंदा व्हावे लागले. पुन्हा भाजपमध्ये परतीचे त्यांच्या प्रयत्नांना सहकाऱ्यांनीच कसा सुरूंग लावला याचे किस्से नाथाभाऊंनीच सांगितले आहे. कौटुंबिक संकटांची मालिका सुरूच आहे. आता नाथाभाऊच्या आयुष्यात बाई,बाटलीच्या राजकीय वादळाने कहर घातला आहे. त्यांचे अनेक महिलांशी संबंध होते या आरोपापासून तर जावई रेव्ह पार्टीत अडकल्याच्या बातम्यांपर्यंत अनेक झंगाट एकनाथ खडसे यांच्या मागे लागली आहेत. पण अशावेळी एक चमत्कारही दिसून आला. त्यांचे कट्टर विरोधक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे ठाकले. नाथभाऊंना वादळाचा तडाखा ...