रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; गणपतीसाठीच्या विशेष रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ

| Updated on: Sep 12, 2021 | 6:31 AM

Konkan Railway | विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळेत कोणताही बदल होणार नाही. वरील विशेष गाड्यांच्या विस्तारित सेवांसाठी विशेष शुल्कावर बुकिंग दिनांक 12.9.2021 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; गणपतीसाठीच्या विशेष रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई: रेल्वेने खाली दिलेल्या तपशीलांनुसार गणपती विशेष गाड्यांचा विशेष शुल्कसह विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. 01261 ​​पनवेल – चिपळूण विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 20.9.2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 01262 चिपळूण – पनवेल विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 20.9.2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

01257 लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष गाडी दिनांक 14.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 16.9.2021 पर्यंत (एक सेवा) वाढवण्यात आले आहे. 01258 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 17.9.2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.

01259 पनवेल – सावंतवाडी रोड विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 17.9.2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.
01260 सावंतवाडी रोड – पनवेल विशेष गाडी दिनांक 14.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 16.9.2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.

विशेष गाड्यांच्या वेळेत कोणताही बदल नाही

विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळेत कोणताही बदल होणार नाही. वरील विशेष गाड्यांच्या विस्तारित सेवांसाठी विशेष शुल्कावर बुकिंग दिनांक 12.9.2021 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

वरील विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा. कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानका दरम्यान कोविड 19 शी संबंधित एसओपी, सर्व नियमांचे पालन करीत या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी असेल.

गणेशभक्तांसाठी मोदी एक्स्प्रेस

भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दादरहून सावंतवाडीपर्यंत मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली होती. दादर ते वैभववाडी करून सावंतवाडीत ही ट्रेन थांबणार होती. 18 डब्यांच्या या ट्रेनमधून 1800 जणांनी प्रवास केला होता. या प्रवाशांना एकवेळचं मोफत जेवणही देण्यात आलं होतं.

‘कोकणात एकटाच भाजपचा आमदार तरीही ट्रेन सोडली, शिवसेनेने किमान अर्धी ट्रेन तरी सोडावी’

कोकणात भाजपचा मी एकटाच आमदार आहे. तरीही मी कोकणवासियांसाठी मोदी एक्सप्रेस सोडू शकतो. तर शिवसेनेच्या आमदारांनी किमान अर्धी ट्रेन का सोडू नये? असा सवाल करतानाच तुम्हाला हे जमत नसेल तर किमान आमच्याकडून तरी धडा घ्यावा, असा चिमटा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला होता.

कोकणात गेल्या दोन वर्षांपासून लोक गेले नाहीत. कोवीडमुळे त्यांना जाता आलं नाही. ती उणीव आज भरून काढली आहे. जर आम्हाला हे जमत असेल तर इतरांनीही यातून धडा घ्यावा, निदान अर्धी ट्रेन तरी सोडावी, असा चिमटा त्यांनी काढला होता.

संबंधित बातम्या:

Ganesh Festival 2021 | संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा, गणपती बाप्पा तुमची सगळी विघ्नं दूर करेल

Ganesh Chaturthi 2021 : गणेशोत्सवादरम्यान या चार चुका अवश्य टाळा, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

कोणी म्हणालं कोरोनाचं संकट दूर कर, कोणी माझ्यावरचं विघ्न दूर कर म्हणालं, तर कोणी सरकारला सुबुद्धी दे म्हणालं; वाचा राजकारणी काय म्हणाले