AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी म्हणालं कोरोनाचं संकट दूर कर, कोणी माझ्यावरचं विघ्न दूर कर म्हणालं, तर कोणी सरकारला सुबुद्धी दे म्हणालं; वाचा राजकारणी काय म्हणाले

कोरोना संकटानंतर आज वर्षभरानंतर पहिल्यांदाच उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत अनेकांनी आपल्या घरात विघ्नहर्त्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. (Ganesh Chaturthi 2021: maharashtra political leaders offers prayers to Lord Ganesha)

कोणी म्हणालं कोरोनाचं संकट दूर कर, कोणी माझ्यावरचं विघ्न दूर कर म्हणालं, तर कोणी सरकारला सुबुद्धी दे म्हणालं; वाचा राजकारणी काय म्हणाले
political leaders
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 3:45 PM
Share

ठाणे: कोरोना संकटानंतर आज वर्षभरानंतर पहिल्यांदाच उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत अनेकांनी आपल्या घरात विघ्नहर्त्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केल्यानंतर राजकारण्यांनी बाप्पाकडे साकडंही घातलं आहे. कुणी राज्यावरील कोरोनाच संकट दूर करण्याची याचना केली. तर कुणी बळीराजावरील संकट दूर करण्याची प्रार्थना केली. काहींनी तर स्वत:वरील विघ्नं दूर करण्याचं साकडं बाप्पाला घातलं आहे. तर काही राजकारण्यांनी सरकारला सुबुद्धी देण्याची प्रार्थनाही भाकली आहे. (Ganesh Chaturthi 2021: maharashtra political leaders offers prayers to Lord Ganesha)

खासदार नवनीत राणा. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खासदार श्रीनिवास पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मनसे नेते संदीप देशपांडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही आपआपल्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली. यावेळी या नेत्यांनी राज्याला कोरोना संकटातून दूर कर, बळीराजावरील संकट दूर कर अशी प्रार्थना केली. गेल्या वर्षी राणा कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांनी मुंबईत गणपती उत्सव साजरा केला होता. यंदा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावती येथील निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना केली. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी कोरोनाच्या संकटावर मात करून कोरोनामुक्त दिवाळी साजरी करण्याचे दिवस येऊ दे, असं साकडं गणरायाला घातलं.

गणरायाच्या आगमनाला पोलिसांचं बँडपथक

साताऱ्यात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी देखील बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. पोलिसांचे बँडपथक आणि पारंपरिक वाद्य वाजवून पोवई नाक्यावरून पालखीतून मिरवणूक काढत गणेशाचे आगमन करण्यात आले. राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, असे साकडे शंभूराज देसाई यांनी गणपती चरणी घातलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले. यावेळी त्यांनीही गणराया चरणी प्रार्थना केली. येणारे सर्व दिवस चांगले आणि निरोगी जावे. लसीकरण जास्त झाले आहे. सरकारने लोकांना कोरोनाची भीती दाखवणे बंद केलं पाहिजे. सरकारला बुद्धी द्यावी ही प्रार्थना गणरायाची चरणी करतो, असं देशपांडे म्हणाले.

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. कोरोनाचे संकट दूर होऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याची ताकत मिळू दे, असं साकडं त्यांनी बाप्पाला घातलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते साखर कारखान्यावर श्रीगणेशाची प्रतिष्ठापना झाली. भाऊराव चव्हाण साखर कारखाना इथे गणपतीची विधिवत पूजा अर्चा करत स्थापना करण्यात आली. यावेळी, ओला दुष्काळ आणि कोरोनापासून मुक्ती मिळू दे, असे साकडे आपण गणरायाला घातले असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

परब म्हणाले, माझ्यावरील विघ्न दूर कर

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे कोकणातील त्यांच्या हरकूळ या गावी आले आहेत. गेल्या 20 ते 22 वर्षापासून ते गणपतीला न चुकता गावी येतात. आज सकाळी त्यांनी गणपतीची सपत्नीक पूजा केली. परब यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी गणरायला स्वत:वरील संकट दूर करण्याचं साकडं घातलं. बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. मी प्रामाणिकपणे काम करतो. त्यामुळे माझ्यावर आलेली सर्व विघ्ने तो दूर करेल असा मला विश्वास आहे, असं परब म्हणाले. यावेळी त्यांनी राज्याला कोरोनाच्या संकटातून मुक्त करण्याचं साकडं बाप्पाला घातलं.

सरकारला सुबुद्धी दे

भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील बीड जिल्ह्यातील आष्टी येथील त्यांच्या राहत्या घरी गणपती बाप्पांची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा केली. सुरेश धस यांनी मुलगी मैथिली हिच्या हस्ते गणरायाचे पूजन करून आरती केली. यावेळी धस यांनी या सरकारला सदबुद्धी देवो, कोरोना दूर होवो शिवाय अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकर मिळो, असे साकडे बाप्पांना घातले.

सर्वांवरचं संकट दूर कर

माजी मंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ येथील घरी आज गणरायाचे मोठ्या थाटात आगमन झाले. राठोड यांच्या घरी गेल्या 15 वर्षांपासून विधीवत पूजा करत अविरत गणेशोत्सव साजरा केला जातो. यावेळी संजय राठोड यांचे आईवडील, भाऊ, पत्नी, मुले मोठ्या उत्साहात गणेश पूजनात सहभागी झाले होते. कोरोनाचं संकट दूर व्हावं. राज्यात शेतकऱ्यावर आलेलं संकट दूर व्हावं. शिवाय सर्वांवरच संकट दूर व्हावं, असं साकडं गणराऱ्याला घातल्याचं राठोड म्हणाले. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर विविध प्रकारचे आरोप केले जातात. सत्ताधारी आणि विरोधकांचे ते कामच आहे. परंतु, आरोप करताना तारतम्य ठेवले पाहिजे. एका प्रकरणातून मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली. सत्य परेशान हो शकता है, पराजित नही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आमचाही न्यायालय आणि लोकशाहीवर विश्वास आहे, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. (Ganesh Chaturthi 2021: maharashtra political leaders offers prayers to Lord Ganesha)

संबंधित बातम्या:

Ganesh Chaturthi 2021 Live Updates | लालबागच्या राजाचं मुखदर्शन

लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी बाजारात गर्दी, औरंगाबादेत बालगणेशाच्या मोहक मूर्तींची भूरळ

पहिल्यांदा कोरोना दूर कर, काही लोकांच्या मनातील रोगही दूर कर; भुजबळांचे गणरायाला साकडे

(Ganesh Chaturthi 2021: maharashtra political leaders offers prayers to Lord Ganesha)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.