पाऊस LIVE : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर मंकी हिलजवळ दरड कोसळली

| Updated on: Jul 08, 2019 | 6:16 PM

गेले दोन दिवस विश्रांती दिलेल्या पावसाने मुंबईत आज पुन्हा जोरदार हजेरी लावली. पहाटेपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाने सकाळी 8 नंतर मोठं रुप धारण केलं.

पाऊस LIVE : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर मंकी हिलजवळ दरड कोसळली
Follow us on

मुंबई : गेले दोन दिवस विश्रांती दिलेल्या पावसाने मुंबईत आज पुन्हा जोरदार हजेरी लावली. पहाटेपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाने सकाळी 8 नंतर मोठं रुप धारण केलं. कामावर जाण्याच्या वेळीच पावसाच्या मोठमोठ्या सरी बरसू लागल्याने अनेकांचा खोळंबा झाला. दादर, शीव, कुर्ला, माटुंगा, लोअर परेल भागात जोरदार पाऊस कोसळला. मोठ्या पावसामुळे सखल भाग असलेल्या दादर, हिंदमाता, परळ यासारख्या काही भागात पाणी साचलं. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवरही पाहायला मिळाला. जोरदार पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली असताना, सकाळी सकाळी विमान वाहतुकीवरही परिणाम झाला. साडेनऊच्या सुमारास विमानाची उड्डाणं रोखण्यात आली.

पाऊस LIVE

[svt-event title=”पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर मंकी हिलजवळ दरड कोसळली” date=”08/07/2019,6:15PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पुण्यात धरणक्षेत्रात दमदार पाऊस” date=”08/07/2019,5:21PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात धरणक्षेत्रात दमदार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, पुण्याच्या ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी [/svt-event]

[svt-event title=”सांगली – वारणा धरण, चांदोली परिसरात अतिवृष्टी” date=”08/07/2019,5:18PM” class=”svt-cd-green” ] सांगली – वारणा धरण, चांदोली परिसरात अतिवृष्टी. वारणा धरण परिसरात मागील 24 तासात दीडशे मिलीमिटर पाऊस. वारणा नदी पातळीत वाढ. वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचे आदेश. मुसळधार पावसामुळे काखे- मांगले आणि कोकरुड- रेठरे पूल पाण्याखाली गेला आहे. शिराळा तालुक्यातुन कोल्हापूर जिल्ह्याशी संपर्क तुटला. रेठरे, जोंधळेवाडी, गोंडोली, भराडवाडी या चार गावांचा संपर्क तुटला आहे. येळापूरजवळ समतानगर येथील मेणी ओढ्यावर असणार्याध पुलावरही पाणी आले होते. पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 2 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. चांदोली परिसरातील मणदुर, सोनवडे, आरळा, करुंगली, मराठेवाडी, काळुंद्रे, पणुंब्रे, चरण येथील वाड्यावस्त्यांवर दमदार पाऊस. [/svt-event]

[svt-event title=”महाड आणि इंदापूरमध्ये पूरसदृष्य परीस्थिती” date=”08/07/2019,5:17PM” class=”svt-cd-green” ] रायगड – जिल्ह्यातील महाड आणि इंदापूरमध्ये पूरसदृष्य परीस्थिती, सावित्री आणि काळ नदीच्या पातळीमध्ये वाढ, इंदापूर शेजारील चार गावांचा संपर्क तुटला. [/svt-event]

[svt-event title=”पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत” date=”08/07/2019,5:16PM” class=”svt-cd-green” ]

नवी मुंबईत कोसळधार

नवी मुंबईत पावसाने रौद्ररुप धारण केलं आहे. सायन पनवेल महामार्गावर अक्षरश: गाड्या वाहून जाण्यासारखी परिस्थिती आहे. खारघर, बेलापूरमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत वाहने आगेकूच करत आहेत.


मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाने मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं भाकीत हवामान विभागाने वर्तवलं आहे.

कोकणात पुढील दोन दिवसात अतिवृष्टी होण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. शिवाय मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मराठवाड्याच्या काही भागांत पावसाची हजेरी लागेल. तर मुंबईसह, रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट म्हणजे दक्ष राहण्याचा इशारा, पुणे हवामान विभागाने दिला.

वसई विरारमध्ये ढग

वसई विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. अधून- मधून पावसाच्या सरी बरसत आहेत.

कोल्हापुरात पंचंगाग पात्राबाहेर

पंचगंगा नदीचे पाणी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्राबाहेर गेले. नदीपात्रात असणारी छोटी छोटी मंदिरं पाण्याखाली गेली.  जिल्ह्यातील छोटे छोटे बंधारे पाण्याखाली गेले.

पुणेकरासाठी आनंदाची बातमी

गेल्या बारा तासात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. खडकवासला 24 मिलिमीटर,पानशेत 85 मिलिमीटर,वरसगाव 84 मिलिमीटर,टेमघर 124 मिलिमीटर,सततच्या पावसाने पुण्याच्या धरण साठ्यात वाढ, पुण्याच्या धरण साठा 7.10  टीएमसी म्हणजेच 24.36  टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. असं असलं तरी हा पाणीसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.41 टक्के पाणीसाठा कमीच आहे. गेल्यावर्षी यावेळी 26.77 टक्के पाणीसाठा होता.