
महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रातील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज (शुक्रवार, ५ जुलै २०२५) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा होत आहे. मुंबईतील वरळी येथील डोम सभागृहात या विजयी मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला.
या मेळाव्याला राज ठाकरेंनी संबोधित केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठीच्या प्रयत्नांबद्दल भाष्य केले. त्यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबरदस्त टोला लगावला. “आजचा मेळावा खरं तर शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण सध्या पाऊस असल्यामुळे मुंबईतअशा मोठ्या मेळाव्यासाठी जागा मिळत नाहीये. बाहेर जे उभे आहेत, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आता (मेळावा) स्क्रीनवर आटपा, असे राज ठाकरे म्हणाले.
“मी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं, त्यातूनच या गोष्टी सुरू झाल्या. कोणत्याही वादापेक्षा आणि कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असं मी म्हटलं होतं. तब्बल २० वर्षांनंतर उद्धव आणि मी एका मंचावर येत आहोत. जे बाळासाहेबांनाही जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हा दोघांना एकत्र आणण्याचं ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं.” असे राज ठाकरे म्हणाले.
आता सर्वच चॅनेलचे कॅमेरे इकडे लागले तिकडे लागले. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. काय वाटतं काय, दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती. कोणी कमी हसलं का. बोलतायत का. आपल्याकडे इतर विषय सोडून इतर गोष्टीत रस असतो अनेकांना. आजचा हा मेळावा. मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तिच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने कुणी पाहायचं नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.