राजस्थानात चार दलितांना मंत्रिपद देणं हा तर काँग्रेसचा भंपकपणा; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

| Updated on: Nov 21, 2021 | 5:09 PM

राजस्थानात काँग्रेसने चार दलित नेत्यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिलं आहे. दलितांवर प्रेम आहे म्हणून काँग्रेसने हा निर्णय घेतलेला नाही. केवळ निवडणुका पाहून काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

राजस्थानात चार दलितांना मंत्रिपद देणं हा तर काँग्रेसचा भंपकपणा; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
ramdas athawale
Follow us on

मुंबई: राजस्थानात काँग्रेसने चार दलित नेत्यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिलं आहे. दलितांवर प्रेम आहे म्हणून काँग्रेसने हा निर्णय घेतलेला नाही. केवळ निवडणुका पाहून काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचं दलितांवरील प्रेम हा दिखाऊपणा आणि भंकपपणा आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारचा आज विस्तार करण्यात आला. त्यात चार दलित नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यावरून काँग्रेसवर दलित कार्ड खेळत असल्याचा आरोप केला जात आहे. केवळ निवडणुकीत काँग्रेसला दलित आणि ओबीसींची आठवण का येते? असा सवाल विरोधकांनी केला आहे. तर दलितांना पुढे आणत असल्याचं काँग्रेसचं धोरण हा केवळ दिखाऊपणा आहे. दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. त्यामुळेच 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

काही फरक पडणार नाही

राजस्थान सरकारमध्ये कितीही फेरबदल केला तरी काहीच फरक पडणार नाही. राजस्थानात भाजपचंच सरकार येईल, असा दावाही आठवले यांनी केला. तर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. राज्यात महिला, शेतकरी, आदिवासींना आरक्षण देण्यात आलं आहे. राज्यात दुसऱ्यांदा काँग्रेसचं सरकार येईल, यावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे, असं पायलट म्हणाले. यावेळी कृषी कायद्यावरून पायलट यांनी भाजपवर टीका केली. कोणत्याही चर्चेशिवाय तीन कृषी कायदे जबरदस्ती थोपवण्यात आले. हे इतिहासात लिहिलं जाईल. वर्षभर आंदोलन झालं. त्यानंतर राजकीय दबाव वाढल्याने मोदींना माफी मागावी लागली. कायदे मागे घ्यावे लागले. मात्र, या लोकांना नुकसान भरपाई कोण देणार? हा प्रश्न अनुत्तरीत असल्याचं ते म्हणाले.

प्रियंका गांधींचा विचार पुढे नेत आहोत

दलित, शोषित, पीडितांना सर्व ठिकाणी प्रतिनिधीत्व मिळावं असं काँग्रेसला वाटतं. बऱ्याच वर्षापासून आमच्या सरकारमध्ये दलितांचं प्रतिनिधीत्व नव्हतं. मात्र, आता त्याची भरपाई केली जात आहे. कॅबिनेटमध्ये आदिवासींचं प्रतिनिधीत्वही वाढवलं जात आहे. आम्ही काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा विचारच पुढे घेऊन जात आहोत. त्यानुसार कॅबिनेटमध्ये तीन महिलांना संधी देण्यात आली आहे. एससी आणि एसटी नेतृत्वालाही संधी देण्यात आली आहे, असं पायलट म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

Farm Laws: शेतकरी संघटना उर्वरित प्रश्नांसाठी पंतप्रधानांना खुलं पत्र लिहिणार, 27 नोव्हेंबरला आंदोलनावर निर्णय

आघाडी सरकार हे वसुली सरकार, पोलखोल करण्यासाठी जनतेत जाणार, भाजप प्रवक्ते राम कदम यांची माहिती

काँग्रेसच्या जनजागरण पदयात्रेला कल्याणमध्ये मानापमानाचं ग्रहण; सेवा दलाने टाकला बहिष्कार