मुंबईने पोसलंय, तिला संकटकाळात सोडून जाणार नाही, राजस्थानी संघटनेची भूमिका

मुंबईने पोसलंय, तिला संकटकाळात सोडून जाणार नाही, राजस्थानी संघटनेची भूमिका

ज्या मुंबईने पोसलं, त्या मुंबईला संकटकाळात सोडून जाणार नाही, अशी भूमिका राजस्थानी संघटनेने घेतली आहे. (Rajsthani JITO organization not to leave Mumbai) 

सचिन पाटील

|

May 09, 2020 | 2:47 PM

मुंबई : लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र अडकलेले हजारो परप्रांतिय मजूर (Rajsthani JITO organization not to leave Mumbai) पायपीट करत किंवा जसं शक्य आहे तसं मूळगावी परतत आहेत. कोणी पायी, कोणी रिक्षा, कोणी सायकल घेऊन त्यांच्या त्यांच्या राज्यात परतत आहेत. परप्रांतिय मजूर एकीकडे मुंबई सोडून त्यांच्या गावी जात आहेत, तर दुसरीकडे राजस्थानी संघटनेने मोठा निर्णय घेतलं आहे. ज्या मुंबईने पोसलं, त्या मुंबईला संकटकाळात सोडून जाणार नाही, अशी भूमिका राजस्थानी संघटनेने घेतली आहे. (Rajsthani JITO organization not to leave Mumbai)

“मुंबई, महाराष्ट्रात राहात असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हे राज्यच आता आमची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. संकटकाळात मुंबई, महाराष्ट्र सोडून जाणार नाही”, असं जितो या राजस्थानी संघटनेने म्हटलं आहे. इतकंच नाही तर अनावश्यक असल्यास राजस्थानच्या लोकांनी महाराष्ट्र सोडून जाऊ नये, असं आवाहनही त्यांनी इतर मजुरांना केलं आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील मजुरांनी त्यांच्या कुटुंबासह पुन्हा आपापल्या राज्यात परत जाण्यास सुरुवात केली आहे. या मजुरांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न राज्य सरकार करीत असल्याने या मजुरांच्या कृतीवर राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया देखील येत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, ओरिसासारख्या राज्यातील नागरिक परत जात असताना, राजस्थानवासीयांनी मुंबई आणि महाराष्ट्रासोबत कायम राहण्याचा निर्धार केला आहे.

मुंबई, महाराष्ट्रला संकटकाळात सोडून जाणं चुकीचे असून अशावेळी आपण महाराष्ट्रासोबत आहोत असं जितो संघटनेच्यावतीने राकेश मुथा यांनी स्पष्ट केले आहे.

कसारा घाटात परप्रांतियांच्या रांगा

परप्रांतिय मजूर आपआपल्या राज्यात परतण्यासाठी मुंबई, ठाणे, भिवंडी या भागातून निघाले आहेत. नाशिकजवळच्या कसारा घाटात या मजूरांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. छोटी वाहनं, रिक्षा, दुचाकी, सायकल वगैरे मिळेल त्या वाहनाने हे मजूर निघाले आहेत. त्यामुळे कसारा घाट अक्षरश: जॅम झाला आहे. हे मजूर लहान मुलं घेऊन रिक्षामध्ये, गाड्यांवरुन निघाले आहेत. उत्तर प्रदेश ,बिहार, राजस्थानकडे  स्थलांतर सुरु आहे.

त्यामुळे कसारा घाट, इगतपुरीमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. कोरोनाच्या भीतीने अभूतपूर्व स्थलांतर होत असल्याचं चित्र आहे.

(Rajsthani JITO organization not to leave Mumbai)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें