Rajyasabha Election: राज्यसभेच्या उमेदवारांपेक्षा त्यांची पत्नी श्रीमंत, राज्यातील ते दोन नेते माहीत आहेत का?

| Updated on: Jun 01, 2022 | 12:34 PM

Rajyasabha Election: गोयल यांच्याकडे 7 कोटी 27 लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीकडे 13 कोटी 31 लाख 90 हजार रुपयांची अचल संपत्ती आहे.

Rajyasabha Election: राज्यसभेच्या उमेदवारांपेक्षा त्यांची पत्नी श्रीमंत, राज्यातील ते दोन नेते माहीत आहेत का?
राज्यसभेच्या उमेदवारांपेक्षा त्यांची पत्नी श्रीमंत, राज्यातील ते दोन नेते माहीत आहेत का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी राज्यसभेसाठी (Rajyasabha Election) भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादीकचून प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांपेक्षा त्यांच्या पत्नी अधिक श्रीमंत असल्याची माहिती पुढे आली आहे. या दोन्ही नेत्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे. गोयल यांच्याकडे 29 कोटींची चल संपती आहे. तर त्यांची पत्नी सीमा यांच्या नावे 50 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्याकडे 14 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांची पत्नी वर्षा पटेल यांच्याकडे 34 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांपेक्षा त्यांच्या पत्नी श्रीमंत असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येत्या 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून एकूण सातजण मैदानात आहेत. यात शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवारांचा समावेश आहे. भाजपकडून पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून इमरान प्रतापगढी यांचा समावेश आहे. यात गोयल यांनी प्रतिज्ञापत्रात 29 कोटी 8 लाख रुपये आणि पत्नी सीमा यांच्याकडे 50 कोटी 16 लाख रुपये एकूण चल संपत्ती असल्याचं दाखवून दिलं आहे. गोयल कुटुंबातील सदस्यांकडे 49 लाख 60 हजार रुपयांची एकूण संपत्ती आहे. याबाबतची माहिती नवभारत टाईम्सने दिली आहे.

गोयल यांच्याकडे किती संपत्ती?

गोयल यांच्याकडे 7 कोटी 27 लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीकडे 13 कोटी 31 लाख 90 हजार रुपयांची अचल संपत्ती आहे. पीयूष गोयल यांच्यावर 1 लाख 25 हजार रुपयांची उधारी आहे. तर पत्नी सीमा यांच्यावर 14 कोटी 27 लाख रुपयांची उधारी आहे. गेल्या तीन वर्षात गोयल यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ झाली आहे. 2020-21मध्ये गोयल यांचं वार्षिक उत्पन्न 62 लाख 37 हजार रुपये होतं. तर 2019-20 मध्ये त्यांचं वार्षिक उत्पन्न 37 लाख रुपये होतं. 2018-19 मध्ये त्यांचं वार्षिक उत्पन्न 33 लाख 17 हजार होतं.

हे सुद्धा वाचा

टोयोटाच्या तीन गाड्या

गोयल यांच्याकडे 3 लाख 71 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. त्यांच्या बँक खात्यात 80 लाख 10 हजार 484 रुपये आहेत. त्यांच्या पीपीएफमध्ये 11 लाख 75 हजार रुपये आहेत. गोयल यांच्याकडे सोन्यासहीत इतर मौल्यवान वस्तू आहेत. त्याची किंमत 3 कोटी 15 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे टोयोटा कंपनीच्या तीन गाड्या आहेत. त्याची किंमत 83 लाख 410 रुपये आहे.

संपत्ती आणि कर्ज

प्रफुल्ल पटेल यांच्याकडे 14 कोटी 36 लाख रुपये आहेत. त्यांची पत्नी वर्षा पटेल यांच्याकडे 34 कोटी 12 लाख रुपयांची चल संपत्ती आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे 80 कोटी 3 लाख 14 हजार रुपयांची चल संपत्ती आहे. पटेल यांच्याकडे 75 कोटी 37 लाख रुपयांची अचल संपत्ती आहे. तर पत्नी वर्षा यांच्याकडे 104 कोटी 56 लाख रुपये आणि त्यांच्या कुटुंबाकडी सदस्यांकडे 107 कोटी 66 लाख रुपयांची अचल संपत्ती आहे. पटेल यांची पत्नी वर्षा यांच्यावर 4 कोटी 1 लाख रुपयांचे उधारी आहे. तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर 10 कोटी 22 लाखांचं देणं आहे.