AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महसूल विभागाचा आजवरचा सर्वात क्रांतिकारी निर्णय, चंद्रशेखर बावनकुळेंनी काय दिली माहिती?

महाराष्ट्र महसूल विभागाने जमिनीचे प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान' अंतर्गत मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचे सर्व दावे १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या काळात निकाली काढले जातील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

महसूल विभागाचा आजवरचा सर्वात क्रांतिकारी निर्णय, चंद्रशेखर बावनकुळेंनी काय दिली माहिती?
chandrashekhar bawankuleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2026 | 11:00 AM
Share

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीच महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. राज्य सरकार आता मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या न्यायालयातील जमिनीचे सर्व महसूली दावे दावे निकाली काढणार आहे. त्यासाठी महसूल विभाग एक विशेष मोहीम राबवणार आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा माहिती दिली. राज्य सरकारने महसूल विभागातील घेतलेला हा आजवरचा सर्वात क्रांतिकारी निर्णय असल्याचं मानलं जात आहे.

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ सुरू करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मेगा प्लॅन तयार केला आहे. या योजनेनुसार मंडळ अधिकारी, तहसीलदार ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या न्यायालयातील जमिनीचे सर्व महसुली दावे निकाली काढण्यात येणार आहे.

सहा महिने अभियान

1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान राज्यभरात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ज्यांच्या ज्यांच्या केसेस तहसीलदारांकडे प्रलंबित आहेत. कलेक्टरकडे प्रलंबित आहेत, वाद सुरू आहेत. ते सोडवण्यासाठी आमचे अधिकारी प्रयत्न करणार आहेत. तुम्हीही या प्रयत्नांना साथ द्या. दर तीन महिन्यांनी लोक अदालत भरवली जाणार आहे. सात महिन्यांत कोट्यवधी दावे निकाली निघणार आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

चाकणमधून उद्योग जाणार नाही

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकणमधील उद्योगांच्या स्थलांतरावर चिंता व्यक्त केली होती. चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे 2,000 हून अधिक कामगार कार्यरत आहेत, असं ट्विट शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत उद्योगमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. चाकणमधील एमआयडीसी तिथून जाऊ नये. यासाठी आमचा प्रयत्न आहे. चाकण एमआयडीसीत रस्त्याची समस्या होती. नितीन गडकरींनी पुणे-चाकण रस्त्यासाठी सुविधा दिली आहे. गरज पडल्यावर शरद पवारांच्या सूचनेवर उदय सामंत काम करतील. एकही उद्योग परत जाणार नाही याची काळजी घेऊ, असं बावनकुळे म्हणाले.

Follow Us
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर