AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या कसाबजी, अफजल गुरुजीही म्हणतील; संजय राऊत यांनी बावनकुळे यांना घेरले

चंद्रशेखर बावनकुळे निवडणुकीची रणनीती ठरवत आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. म्हणजे काय असतं रणनीती? त्यांना माहिती आहे का रणनीती म्हणजे काय?

उद्या कसाबजी, अफजल गुरुजीही म्हणतील; संजय राऊत यांनी बावनकुळे यांना घेरले
उद्या कसाबजी, अफजल गुरुजीही म्हणतील; संजय राऊत यांनी बावनकुळे यांना घेरलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 05, 2023 | 11:04 AM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला आहे. त्यावरून आता विरोधकांनी बावनकुळे यांच्यासहीत भाजपला घेरलं आहे. जे पोटात होतं, तेच ओठावर आलं, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीने बावनकुळे यांना घेरलं आहे. तर बावनकुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यावर सारवासारव केली आहे. आता या वादात ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. उद्या ते कसाबजी, अफजल गुरुजीही म्हणतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली. त्यांच्या पोटात होतं ते ओठावर आलं म्हणूनच त्यांनी औरंगजेबजी असा उल्लेख केला. उद्या कसाबजी म्हणतील. मग अफजल गुरुजी म्हणतील, अफजल खानजी म्हणतील. मग शाहिस्ते खानजी म्हणतील. यावरच त्या पक्षाची रोजीरोटी सुरू आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

चंद्रशेखर बावनकुळे निवडणुकीची रणनीती ठरवत आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. म्हणजे काय असतं रणनीती? त्यांना माहिती आहे का रणनीती म्हणजे काय? खोके, पेट्या, पाकिटं कुठे कशी वाटायची? कुणाला कसं विकत घ्यायचं? ही रणनीती असते त्यांची. रणनीती ठरवायची तर लोकं ठरवतील. मतदार ठरवतील. काय करायचं याची लोकं वाट बघत आहेत. खोकेवाले कधी येताहेत त्याची वाट पाहत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे संजय राऊतांविरोधात कोर्टात जाणार आहेत. तसेच राऊत यांना नोटीसही बजावणार आहेत. त्यावरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शेवाळेंची खिल्ली उडवली. कुणाकडून? बाप रे? होय का? मला वाटलं अणूबॉम्बच पडला मुंबईवर. सोडा हो. अशा नोटिसा आम्हाला रोजच येत असतात, असं म्हणत त्यांनी शेवाळेंची खिल्ली उडवली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाशिकला सभा होणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नाशिक गोल्फ कल्बवर उद्धव ठाकरे यांची मोठी विराट सभा होईल. या सभेची तयारी सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रासाठीची ही सभा असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा