AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले’, संजय राऊतांचा मोठा दावा

"आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच", असा घणाघात संजय राऊतांनी केला.

'माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले', संजय राऊतांचा मोठा दावा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 09, 2022 | 11:39 PM
Share

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आपल्या भांडूप येथील घरी दाखल झाल्यानंतर त्यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी एक मंच उभारण्यात आला होता. तिथे राऊतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राऊतांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना तुफान फटकेबाजी केली. विशेष म्हणजे आपल्याला अटक करण्याचे आदेश दिल्लीतून आले होते, असा धक्कादायक दावा त्यांनी यावेळी केला.

“माझ्या अटकेचा आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो हमारी सरकार आएँगी ! हे मला माहिती होतं”, असं संजय राऊत म्हणाले.

“आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच. ती सुद्धा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दांत संजय राऊत कडाडले.

“मुंबई महापालिका, मुंबई आपल्या हातातून काढण्यासाठी शिवसेना फोडलीय हे लक्षात घ्या. पण ते होणार नाही”, असं राऊत म्हणाले.

“मी आज आर्थर रोड जेलमधून सुटल्यापासून जे वातावरण पाहतोय की माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकासाठी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात ऊर्जा निर्माण झालीय. ही खरी शिवसेना आहे. हा खरा आपला परिवार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“माझी सेक्युरिटी काढली. काढाना. मी तुम्हाला घाबरतो का?”, असा सवाल त्यांनी केला.

“मला पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न, शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. किशोरी पेडणेकरांना त्रास देत आहेत. काल भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल केला. सुषमा अंधारे यांच्यावर काहीतरी चालू आहे. करु द्या”, असं ते यावेळी म्हणाले.

“ज्याने शिवसेना फोडली, तोडली, आमचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, शिवसेनेचा नाव गोठवण्याचा प्रयत्न चालू आहे त्या सर्वांच्या छातडावर बसून शिवसेनेचं तेच तेज आणि वैभव, ताकद आकाशाला गवसणी घालणारी असेल. माझ्या अटकेने सुरुवात झालीय. आता सुटलोय. सुसाट सुटायचं आहे”, असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले.

“आता रडायचं नाही, आता लढाई सुरु झालीय. आता संपायचं नाही. 103 दिवस तुरुंगात राहीलो. 103 आमदार निवडून येणार. प्रत्येक संकट ही संधी आहे. मी शंभर दिवस तुरुंगात राहीलो. मला माहिती होतं की प्रत्येक कार्यकर्ते माझी वाट पाहत आहेत. हे प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळू शकतं”, असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?