Sanjay Raut: मुख्यमंत्री शरद पवार, अन् संजय राऊत बोलता बोलता बोलून गेले

| Updated on: May 03, 2022 | 12:59 PM

Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

Sanjay Raut: मुख्यमंत्री शरद पवार, अन् संजय राऊत बोलता बोलता बोलून गेले
मुख्यमंत्री शरद पवार, अन् संजय राऊत बोलता बोलता बोलून गेले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला डेडलाईन दिली आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, ही प्रतिक्रिया देताना राऊतांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंऐवजी शरद पवार यांचा उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार… (sharad pawar) असं राऊत म्हणाले. त्यानंतर चुकीचं विधान गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तात्काळ दुरुस्ती केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सक्षम नेते आहेत, अशी दुरुस्ती त्यांनी केली. पण राऊत यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, राऊत यांनी राज्य सरकार कोणत्याही अल्टिमेटमला जुमानत नसल्याचं स्पष्ट केलं. जे कायदेशीर आहे त्याच गोष्टी होतील. बेकायदेशीर गोष्टींना राज्यात थारा नाही, असं सांगून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कुणी करत असतील तर ते भ्रमात आहेत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना नेते संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांच्याकडून बोलता बोलता गलती से मिस्टेक झाली. राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील हे संयमी आणि सक्षम नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार अ… या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तितकेच सक्षम आणि मजबूत नेते आहेत. या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार हे सर्वात अनुभवी नेते आणि प्रशासक आहे. त्यामुळे या राज्यात कोणी अल्टिमेटम देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते भ्रमात आहेत. या राज्यात असं काहीही होऊ शकत नाही. कारण या राज्यातील जनताच सूज्ञ आहे. या राज्यातील फुले विरुद्ध टिळक हा वाद कोणी लावत असेल तर तो निरर्थक ठरेल. हे तुम्ही दोन दिवसात पाहिलं आहे, असं राऊत म्हणाले.

वैफल्या इतरांच्या माध्यमातून काढत आहेत

एखाद्या राजकीय पक्षाला राज्यातील शांतता बिघडवायची असेल त्यासाठी त्यांनी कुणाला सुपारी दिली असेल तर अशा लोकांचा शोध घेतला पाहिजे. राज्य सरकारने अशा लोकांनना शोधलं पाहिजे. काही लोकांना महाराष्ट्रातील जनतेने दूर केलं आहे. त्याचं वैफल्य ते इतरांच्या माध्यमातून काढत आहेत. याला शौर्य म्हणत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

आम्हाला फरक पडत नाही

जे आमच्याविरोधात समोरून लढू शकत नाही. ज्यांच्याकडे हिंमत नाही ते लोक असे छोटेमोठे पक्ष पकडतात आणि आमच्यावर हल्ले करतात. पण अशा हल्ल्यांचा आम्हाला फरक पडत नाही. अशा हल्ल्यांना तोंड देण्यास आम्ही सक्षम आहोत, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.