तर ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी, ज्ञानेश कुमार केवळ पक्षीय आंदोलनाने राजीनामा देणार नाहीत; तर, संपूर्ण देशाने एकत्रित येऊन आंदोलन करावे, असा दावा केला आहे.

तर ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 10:45 AM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात वादळ निर्माण झालं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आंदोलने सुरू केली आहेत. काँग्रेसने काल महाराष्ट्रात जोरदार आंदोलन केलं. त्या आधी काँग्रेसने दिल्लीसह इतर राज्यांमध्ये उग्र आंदोलने केली आहेत. सीजेपीनेही येत्या 2 ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर ठाकरे बंधुंनी येत्या 4 ऑक्टोबर रोजी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाचं रान उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. सर्वांनीच ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे. एक पक्षीय आंदोलनाने ज्ञानेश कुमार हे राजीनामा देणार नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.

काल काँग्रेसने महाराष्ट्रभर स्वतंत्र आंदोलन केलं. काँग्रेसने पक्ष म्हणून स्वतंत्र आंदोलन केलं. प्रत्येकाने आंदोलन करावं. पण महाविकास आघाडी म्हणून एकत्र आंदोलन केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यासाठी निमंत्रण देण्याची गरज नाही. काँग्रेसने काल नागपूरला मोठं आंदोलन केलं. आज त्यांना आवाहन करतो, सर्वांनी या मुद्द्यावर एकत्र यावं. एक पक्षीय आंदोलनामुळे ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत. अख्खा देश एकवटला पाहिजे. तरच ज्ञानेश कुमार जातील, असं संजय राऊत म्हणाले.

Loading...

मोठा मोर्चा काढणार

राजीनामा मागण्यासाठी देशभरात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुंबईतून मोर्चाचं आयोजन होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. हा मोर्चा कुठून निघेल? काय निघेल? हे उद्धव आणि राज ठाकरे आज सांगतील. हा मोठा मोर्चा असेल. मुंबईतून महात्मा गांधींनी चले जावचा नारा दिला होता. त्यानंतर ब्रिटिश गेले. त्या पद्धतीने हा मोर्चा निघेल, असं त्यांनी सांगितलं. आज 3 वाजता इंडिया ब्लॉकची बैठक आहे. आम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सामील होऊ. त्याबाबत वरिष्ठांना सांगितलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तेव्हाच राजीनामा होईल

ज्ञानेश कुमार जाण्याचा 4 तारखेच्या आत कोणताही निर्णय होणार नाही. आंदोलनाची धग जसजशी वाढेल, ती दिल्लीत पोहोचेल, त्यानंतर घडामोडी घडतील. इंडिया आघाडीच्या बैठकीत आज जो निर्णय होईल, त्यानंतर सरकार पाऊल उचलणार आहे. दीपके यांच्या नेतृत्त्वात 2 तारखेला आंदोलन आहे. या सर्व आंदोलनाचा भडका उडेल तेव्हाच ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईल, असंही ते म्हणाले.

पातक फडणवीस यांच्या माथी

यावेळी त्यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. खर्चाची उधळण तुम्ही करत आहात. कर्ज काढून सण साजरे करत आहेत. लाडकी बहीण योजना वगैरे ही तिजोरीची लूट आहे. या योजनेतून पुरुषांनाही लाभ दिला, तो वसूल करा. रडता कशाला? तुमच्या तिजोरीतील पैसे तुम्ही उडवले म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची का? प्रत्येक आत्महत्येचं पातक फडणवीस यांच्या माथी येईल, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us