कर्नाटकच्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार, मोदी-शहा गप्प का?; संजय राऊत यांचा सवाल

| Updated on: Mar 13, 2021 | 11:15 AM

बेळगावात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. (sanjay raut slams bjp over belgaum dispute)

कर्नाटकच्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार, मोदी-शहा गप्प का?; संजय राऊत यांचा सवाल
शिवसेना नेते संजय राऊत
Follow us on

मुंबई: बेळगावात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. बेळगावात कानडींकडून मराठी माणसांवर खुनी हल्ले सुरू असून त्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असं सांगतानाच पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. (sanjay raut slams bjp over belgaum dispute)

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना बेळगावातील हल्ल्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. कन्नड वेदिकेकडून बेळगावमध्ये हल्ले सुरू असून या ठिकाणी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पाठवलं पाहिजे. नाही तर कर्नाटकात तणाव वाढेल, असं सांगतनाच मी सुद्धा बेळगावला जाणार आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

कन्नड वेदिका भाजप स्पॉन्सर संघटना

सांगली, सोलापूरचे लोक बेळगावात घुसले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. हा भाषा वाद आहे. तो फार वाढू नये. आम्ही राष्ट्रीय एकात्मता मानतो. कर्नाटकनेही राष्ट्रीय एकात्मता मानली पाहिजे. बेळगावात कर्नाटक सरकारची दडपशाही सुरू आहे. कन्नड वेदिका संघटनेच्या फडतूस लोकांनी वातावरण बिघडवले आहे. ही भाजप स्पॉन्सर संघटना असून बेळगावातील परिस्थितीला भाजपच जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मोदी-शहा गप्प का?

बेळगावात खुनी हल्ला सुरू आहे. आमच्या लोकांवर हल्ला होता आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही शांत आहेत. पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हल्ल्याची भाजपला चिंता वाटते. मग कर्नाटकमधील हल्लांबाबत मोदी आणि शहा गप्प का? असा सवालही त्यांनी केला.

आमचेही हात बांधलेले नाहीत

बेळगावात आमची डोकी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असेल तर आमचेही हात बांधलेलेन नाहीत. आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, हा काही भारत-पाकिस्तान वाद नाही. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ या प्रश्नात लक्ष घालावं, असं आवाहनही त्यांनी केलं. (sanjay raut slams bjp over belgaum dispute)

 

संबंधित बातम्या:

LIVE | नागपुरात लॉकडाऊनच्या आधी होत असलेली गर्दी चिंता वाढविणारी

सीताराम कुंटे अ‍ॅक्शन मोडमध्ये, महापालिका आयुक्तांसह पोलीस आयुक्तांची कानउघडणी

Aurangabad Lockdown | औरंगाबादेत कडकडीत बंद, काय सुरु, काय बंद?

(sanjay raut slams bjp over belgaum dispute)