शरद पवार हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर, उदय सामंत यांनी सांगितलं भेटीमागचे कारण

काही विषयांवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली असेल. महाराष्ट्राच्या दृष्टीने विकासात्मक घडामोडींवर ही भेट घेतली असेल. औद्योगिक क्षेत्रात कसं पुढं जायचं, यावरही ही चर्चा होऊ शकते.

शरद पवार हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर, उदय सामंत यांनी सांगितलं भेटीमागचे कारण
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 8:29 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकांची तयार सुरू झाली आहे. शरद पवार यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमागचे कारण अस्पष्ट आहे.  उद्योगमंत्री शरद पवार हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षावर दाखल झाले. यासंदर्भात उदय सामंत म्हणाले, मी कोकणच्या दौऱ्यावर आहे. देशाचे नेते शरद पवार हे चारवेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. काही विषयांवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली असेल. महाराष्ट्राच्या दृष्टीने विकासात्मक घडामोडींवर ही भेट घेतली असेल. औद्योगिक क्षेत्रात कसं पुढं जायचं, यावरही ही चर्चा होऊ शकते.

उदय सामंत यांनी शरद पवार यांच्यासोबत काम केलंय. शरद पवार हे कित्तेक वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यामुळे राजशिष्टाचार कसा पाळावा, हे त्यांना चांगले माहीत आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही सूचना करायच्या असतील. काही विकासात्मक कामाच्या संदर्भात चर्चा करायची असेल. त्यासाठी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असावी, असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांच्या हातात कागदपत्र

माहिती घेऊन बोलेन, असंही उदय सामंत यांनी म्हटलं. राज्याच्या राजकारणासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. महाविकास आघाडी हे शिंदे मंत्री असताना भेटी होत होत्या. परंतु, शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवार त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी कधी गेले नव्हते. शरद पवार यांच्या हातात काही कागदपत्र आहेत. त्यामुळे काही महत्त्वाच्या विषयावर ही चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाकरे परदेशात असताना पवार यांची शिंदे यांच्याशी भेट

उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. अशावेळी शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भेट आहे का, अशी चर्चा आहे. पवार यांच्या भेटीमागे काहीतरी कारण असते. या भेटीमागे नेमकं काय याची उत्सुकता ताणली गेली आहे.

Non Stop LIVE Update
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल.
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.