गोवंडी-मानखुर्द उड्डाणपुलाला शरद पवारांचे नाव द्या, राष्ट्रवादीची मागणी

| Updated on: Mar 05, 2021 | 8:07 PM

सध्या घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड गोवंडी या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. (Sharad pawar name Ghatkopar-Mankhurd Link Road)

गोवंडी-मानखुर्द उड्डाणपुलाला शरद पवारांचे नाव द्या, राष्ट्रवादीची मागणी
Sharad Pawar
Follow us on

मुंबई : मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे नामकरण करावे. या उड्डाणपुलाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अय्युब शेकासन यांनी केली आहे. अय्युब शेकासन याबाबत मंत्री नवाब मलिक आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहिलं आहे. (Sharad pawar name to Ghatkopar-Mankhurd Link Road Demand from NCP)

राष्ट्रवादीच्या पत्रात काय म्हटलं?

घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड हा पूर्व उपनगरातील वाहतुकीत महत्वाची भूमिका बजावतो. हा उड्डाणपूल मुंबई महानगरपालिकेचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई महानगर पालिकेच्या सर्वात मोठ्या उड्डाण पुलाचे निर्माण महापालिकेच्या एम-पूर्व विभागातंर्गत केले जात आहे. सध्या घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड गोवंडी या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. हा उड्डाणपूल लवकरच तयार होण्याची शक्यता आहे. या निर्माणाधीन उड्डाणपुलाला शरद पवार यांचे नाव द्या, असे अय्युब शेकासन यांनी पत्रात म्हटलं आहे.

“महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भरीव योगदान दिले आहेत. शरद पवार यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करण्यासाठी पालिकेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अय्युब शेकासन यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे संपूर्ण पत्र 

या मागणीवर पालिकेच्या वतीने सकारात्मक विचार होऊन लवकरच ही मागणी पूर्णत्वास येईल. याची मला खात्री आहे” अशा शब्दांत अय्युब शेकासन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Sharad pawar name to Ghatkopar-Mankhurd Link Road Demand from NCP)

संबंधित बातम्या : 

सांगलीतला राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ पुण्यात फेल! स्थायी आणि शिक्षण समितीवर भाजपचाच अध्यक्ष

सेंद्रीय शेतीचं धोरण कसं असावं?, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

OBC पदोन्नतीबाबत सरकारचं धोरण चुकीचं, निर्णय मागे घ्या नाहीतर मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही : पडळकर