सांगलीतला राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ पुण्यात फेल! स्थायी आणि शिक्षण समितीवर भाजपचाच अध्यक्ष

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपचाच उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे सांगलीत बसलेल्या झटक्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दिलासा मिळाला असंच म्हणावं लागेल.

सांगलीतला राष्ट्रवादीचा 'करेक्ट कार्यक्रम' पुण्यात फेल! स्थायी आणि शिक्षण समितीवर भाजपचाच अध्यक्ष
पुणे महापालिका

पुणे : भाजपचं बहुमत असतानाही सांगली मिरज कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादीनं भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. तिच पुनरावृत्ती पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. पण पुणे महापालिकेच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपचाच उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे सांगलीत बसलेल्या झटक्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दिलासा मिळाला असंच म्हणावं लागेल.(BJP candidate wins Pune Municipal Corporation Standing and Education Committee)

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे हेमंत रासणे हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू गायकवाड यांना पराभव पक्तरावा लागला आहे. भाजपचे हेमंत रासणे यांना 10 तर महाविकास आघाडीचे बंडू गायकवाड यांना 6 मतं मिळाली आहे. तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदीही भाजपच्या उमेदवार मंजुश्री खर्डेकर यांचा विजय झाला आहे.

भाजपकडून व्हिप जारी

दरम्यान, सांगली महापालिकेचा धसका घेतलेल्या भाजपने पुणे महापालिकेच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीसाठी नगरसेवकांना व्हिप जारी केला होता. भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याच्या चर्चांवरुन भाजपने स्थायी आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीपूर्वी सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.

स्थायी समिती पक्षीय बलाबल –

भाजप – १०
राष्ट्रवादी – ४
काँग्रेस – १
सेना – १

पालिका पक्षीय बलाबल –

भाजप – ९९
राष्ट्रवादी – ४२
काँग्रेस – १०
सेना – १०
एमआयएम – १
मनसे – २

पिंपरी-चिंचवडमध्येही तिजोरीच्या चाव्या भाजपकडेच

पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा विजय झाला. सांगली महापौर निवडणुकीप्रमाणे ‘करेक्ट कार्यक्रमाची’ पुनरावृत्ती करण्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीला पराभवाला सामोरं जावं लागलं. पिंपरी चिंचवड स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नितीन लांडगे विराजमान झाले आहेत.

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण भालेकर यांचा पराभव झाला. भाजपचे नितीन लांडगे 10 विरुद्ध 5 मतांनी विजयी झाले. भाजपचे नाराज सदस्य रवी लांडगे निवडणुकीला अनुपस्थित होते. सांगली महापौरपदाच्या निवडणुकीत केलेल्या ‘करेक्ट कार्यक्रमाची’ पुनरावृत्ती करु, असा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीला पराभवाचा फटका बसला.

सांगलीतला ‘करेक्ट कार्यक्रम’ नेमका काय?

सांगली महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड झाली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची सहा मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.

संबंधित बातम्या :

सांगलीतील पराभवाचा भाजपला धसका, पुण्यात खबरदारी! नगरसेवकांना व्हिप जारी

सांगलीची पुनरावृत्ती टळली, पिंपरी चिंचवडच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे, राष्ट्रवादीचा पराभव

BJP candidate wins Pune Municipal Corporation Standing and Education Committee

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI