AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्ते नेते एकीकडे, अजित पवार दुसरीकडे

sharad pawar resigns : शरद पवार यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णयानंतर त्यांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी नेते अन् कार्यकर्त्यांकडून दबाब येत आहे. दुसरीकडे अजित पवार शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत.

शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्ते नेते एकीकडे, अजित पवार दुसरीकडे
NCP
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 03, 2023 | 2:07 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राष्ट्रवादीत जणू भूकंप आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय अमान्य केला आहे.  शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह धरत आहेत. यावेळी छगन भुजबळ, जयंत पाटील यांना तर बोलताना अश्रूच अनावर झाले. परंतु यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन केले.

पक्षातील कार्यकर्त्यांकडून दबाब

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय अमान्य केला आहे. शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह धरत आहेत. काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. जयंत पाटील यांना तर बोलताना अश्रूच अनावर झाले. छगन भुजबळ यांनीही पवार साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी भूमिका घेतलीय.

काय म्हणाले अजित पवार

सगळ्याचा भावना साहेबांनी ऐकल्या. पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही, असा गैरसमज तुम्ही करुन घेत आहेत. परंतु आज काँग्रेसचे अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन खरगे, पक्ष चालला आहे सोनियाजींच्या नावावर. पवार साहेबांचा वयाचा विचार करता नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल.

नवीन अध्यक्ष असा काम करणार

साहेब अध्यक्ष असो किंवा नसो, असाच परिवार जात राहील. साहेब आहेतच ना, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणार आहे. साहेबांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे. साहेबांचा निर्णय एक धक्का आहे. पण साहेब आपल्या निर्णयावर ठाम आहेत. साहेबांच्या मार्गदर्शनखाली पक्ष चालणार आहे. साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको? या शब्दांत चार खडे बोल कार्यकर्त्यांनी सुनावले. नवीन येणारा अध्यक्ष साहेबांशी चर्चा करुन निर्णय घेईल. साहेब काल निर्णय जाहीर करणार होते. परंतु काल महाविकास आघाडीची सभा होती. त्यामुळे हा निर्णय आज जाहीर केला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?