AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : ‘…तेव्हा XXX पातळ झालेली’; मोदी-ठाकरेंच्या ‘त्या’ भेटीबाबत एकनाथ शिंदेंकडून मोठा गौप्यस्फोट!

उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. ठाकरेंनंतर शिंदेंनी आपल्या सभेमध्ये बोलताना एक भेटीबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.

Eknath Shinde : '...तेव्हा XXX पातळ झालेली'; मोदी-ठाकरेंच्या 'त्या' भेटीबाबत एकनाथ शिंदेंकडून मोठा गौप्यस्फोट!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 19, 2023 | 10:24 PM
Share

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे गटाने शक्ती प्रदर्शन केली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. षण्मुखानंद या सभागृहामध्ये बोलताना ठाकरेंनी तोफ डागली. मनिपूर, लसीवरून त्यांनी केंद्राला लक्ष्य केलं. ठाकरेंनंतर शिंदेंनी आपल्या सभेमध्ये बोलताना एक भेटीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी किती शिव्या दिल्या. अब्दाली, हिटलर, अफजलखान…अरे ते कुठे आणि तुम्ही कुठे, सर्व राज्याने पाहिलं आहे की एक नोटीस आली त्यावेळी लेंडी पातळ झाली होती. शिष्टमंडळ घेऊन गेले होते मोदींना भेटायला तेव्हा शिष्टमंडळ ठेवलं बाहेर आणि शिष्टाई गेली आत. हे आम्हाला काही माहित नाही का? सर्व माहित असल्याचं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

रिक्षावाला म्हणून हेटाळणी करत होताे मात्र याच रिक्षाने तुमच्या मर्सडिजला खड्ड्यामध्ये गाडून टाकलं. सर्वसामान्यांची रिक्षा असून नादी लागू नका. भाजीवाले, चहावाले, टॅक्सीवाले यांना घेऊन बाळासाहेबांनी यांनाच घेऊन शिवसेना मोठी केली. आतापर्यंच्या इतिहासात जितक्या सहा झाल्या तेवढ्या मी एकाच दिवसात केल्या. अगोदरचे मुख्यमंत्री पेन ठेवचत नव्हते पण माझ्याकडे दोन पेन असल्याचं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर आक्रमण केलं.

दरम्यान, बिपरजॉय वादळ आलं तेव्हा तीन दिवस गुजरातमध्ये तळ ठोकून बसले होते. मात्र 26 जुलैच पूर आला तेव्हा तुम्ही आमच्या दैवत बाळासाहेबांना सोडून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायला गेला होतात  हे काय माहित नाही का कोणाला? असंही शिंदे म्हणाले.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.