यापुढे दिल्लीच्या तख्तासंदर्भात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल; संजय राऊत यांचं मोठं विधान

शिवसेनेच्या 55व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. शिवसेनेने मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा कधीच सोडला नाही. किंबहूना तोच विचार घेऊन शिवसेना पुढे जात आहे. (sanjay raut)

यापुढे दिल्लीच्या तख्तासंदर्भात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल; संजय राऊत यांचं मोठं विधान
संजय राऊत, खासदार, शिवसेना
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 10:39 AM

मुंबई: शिवसेनेच्या 55व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. शिवसेनेने मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा कधीच सोडला नाही. किंबहूना तोच विचार घेऊन शिवसेना पुढे जात आहे, असं सांगतानाच शिवसेना पाच सहा महिन्यात संपेल असं सांगितलं जात होतं. पण अनेक पक्ष आले आणि गेले. शिवसेना महाराष्ट्राची सीमा ओलांडून पुढे जात आहे. यापुढे दिल्लाच्या तख्तासंदर्भातही शिवसेनेची भूमिका महत्त्वाचीच राहील, असं मोठं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी आगामी काळात शिवसेना राष्ट्रीय राजकारणात जोमाने उतरणार असल्याचेच संकेत दिल्याने शिवसेनेच्या आगामी भूमिकांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. (shiv sena will play major role in national politics, says sanjay raut)

शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. पाच सहा महिन्यात शिवसेना संपणार असं म्हटलं जात होतं. पण आज शिवसेना 55 वर्षाची झाली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची पाळंमुळं घट्ट रोवली आहेत. मुंबईच्या सीमा ओलांडून देशात गेली आहे. दिल्लीत गेली आहे. देशात शिवसेनचं महत्त्व कायम आहे, असं राऊत म्हणाले.

शिवसेनेचा विचार महत्त्वाचा राहणार

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा… या ओळी बहुदा शिवसेनेच्या भविष्यासाठीच लिहिल्या असाव्यात. येणाऱ्या काळात शिवसेना राष्ट्रीय राजकारणातही सक्रिय राहणार आहे. त्यामुळेच आगामी काळात देशाच्या तख्तासंदर्भात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शिवसेनेचा विचार महत्त्वाचा राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना हा मोठा चमत्कार

एक छोटं संघटन म्हणून शिवसेनेची सुरवात झाली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारं हे संघटन आहे. त्यामुळे मुंबईच्या पुढे जाणार नाही, शिवसेनेची धाव पालिकेपर्यंत राहील असं भाकीत केलं गेलं. पण आज शिवसेनेचा राज्यात मुख्यमंत्री आहे. किती आले आणि गेले, शिवसेना कायम आहे. शिवसेनेचा विचार कायम आहे. भारताच्या राजकारणात शिवसेना हा मोठा चमत्कार आहे, असं ते म्हणाले.

शिवसेना ताऱ्या सारखी चमकत राहील

शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यांच्याच विचारधारेवर शिवसेना पुढे जात आहे. आम्ही मराठी माणसाचा विषय कधीच सोडला नाही. त्यामुळे शिवसेना मराठी माणसाला महत्त्वाची वाटते. हिंदुत्व आमि मराठी हे दोन विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे असून येणाऱ्या काळात शिवसेना ताऱ्या सारखी चमकत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (shiv sena will play major role in national politics, says sanjay raut)

 

संबंधित बातम्या:

वर्धापनदिनी सेनेची डरकाळी, अंगावर याल तर ‘हर हर महादेव’ गर्जना करुन हिशेब करु, भाजपला इशारा

भाजपचं ओळखपत्र दाखवा, पेट्रोल मोफत मिळवा; शिवसेनेच्या वर्धापनदिनी खास ऑफर

सावधान! तुमच्याभोवतीही सेक्सटॉर्शनचं जाळं, नव्या सायबर क्राईमचं पोलिसांसमोर चॅलेंज

(shiv sena will play major role in national politics, says sanjay raut)