शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती ही एकाचं शक्तीची रूपं, उद्धव ठाकरे यांचे संकेत काय?

| Updated on: Nov 30, 2022 | 7:31 PM

पाठीवर कौतुकाची थाप मारली, पण, अशा थापा मारल्या नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला.

शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती ही एकाचं शक्तीची रूपं, उद्धव ठाकरे यांचे संकेत काय?
उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई – शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती, ही एकाच शक्तीची रूप आहेत. या तिन्ही शक्ती एकवटल्या तर किती प्रचंड मोठी ताकद महाराष्ट्रात नाही तर देशात होईल. असे संकेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वांद्रे येथील लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईमध्ये तुमची संख्या अडीच तीन लाख असेल. संख्या किती महत्त्वाची हे निवडणुकीच्या वेळेला कळते.

मुंबई आपली राजधानी आहे. लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे यांचा आपण जयजयकार करतो. अण्णाभाऊ संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष केला. त्यांनी मिळवून दिलेली मुंबई आपल्या ताब्यात ठेवायची आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.


मी मुख्यमंत्री होतो पण, थापा कधी मारल्या नाही. पाठीवर कौतुकाची थाप मारली, पण, अशा थापा मारल्या नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला.

भुलथापा मारायच्या सगळ्यांना संमोहित करायचं. हे पाप आपण कधी केलं नाही. आता मी बाहेर पडायला लागलो. गेल्या शनिवारी बुलडाण्याला जाऊन आलो. दोन-अडीच वर्षांचा कालखंड तुम्हाला माहीत आहे.

आधी कोविडमध्ये गेले. नंतर काही दिवस हे आजारपणात गेले. घरी होतो तेव्हा घराबाहेर केव्हा पडणार. आता घराबाहेर पडायला लागलो तर यांच्या पोटात गोळा आलायं, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

काम करताना ज्या काही अडचणी येतात त्यातून आपण पुढं गेलो पाहिजे. मातंग समाजाला मी आपलं मानलं. त्यामुळं तुमच्याकडं दुर्लक्ष झालं हे सत्य आहे. अण्णाभाऊ साठे यांना अजून भारतरत्न दिला जात नसल्याची खंत यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.