‘कशाला तोंड उघडायला लावताय?’ शिवसेनेची ऑफर धुडकावणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींवर राऊतांचा हल्लाबोल

| Updated on: May 28, 2022 | 12:12 PM

संजय राऊतांनी आज संभाजीराजेंची उमेदवारी आणि शिवसेनेवर होणाऱ्या विश्वासघाताच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय. "आमच्यासाठी राज्यसभा निवडणुकीचा विषय आता संपला आहे. संभाजी राजेंबद्दल आमच्या मनात आजही प्रेम आणि आदर आहे",असं राऊत म्हणाले आहेत.

कशाला तोंड उघडायला लावताय? शिवसेनेची ऑफर धुडकावणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींवर राऊतांचा हल्लाबोल
Follow us on

मुंबई : छत्रपती संभाजी राजेंना (Cambhajiraje Chhatrapati) शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची उघड चर्चा होती. पण शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर काल संभाजी राजे यांनी आपली उद्विग्नता बोलून दाखवली. शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही, असा थेट आरोप केला. त्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) त्यावर शिवसेनेची भूमिका मांडली. त्यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी ‘कशाला तोंड उघडायला लावताय?’, असं म्हटलं. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या मालकीचे नाहीत, तर ते संपर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत. आमच्यासाठी राज्यसभा निवडणुकीचा विषय आता संपला आहे. आम्ही संजय पवारांना उमेदवारी दिली आहे , असं संजय राऊत म्हणालेत.

“राजेंबद्दल आजही आदर, पण”

संजय राऊतांनी आज संभाजीराजेंची उमेदवारी आणि शिवसेनेवर होणाऱ्या विश्वासघाताच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय. “आमच्यासाठी राज्यसभा निवडणुकीचा विषय आता संपला आहे. संभाजी राजेंबद्दल आमच्या मनात आजही प्रेम आणि आदर आहे. पण आम्ही संजय पवारांना उमेदवारी दिली आहे. संभाजी राजेंनेही त्यांची भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता हा विषय नको”, असं म्हणत राजेंच्या शिवनसेना पुरस्कृत उमेदवारीला पक्षाच्या वतीने पूर्णविराम दिला आहे.

“चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का?”

जुनी आठवण करून देत भाजपच्या वतीने शिवसेनेवर गद्दारीचा टॅग लावला जात आहे. त्यावरही राऊत बोलते झाले. “चंद्रकांत पाटील एवढ्या अधिकारीवाणीने का बोलत आहेत, ते काय शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का?”, असा थेट सवाल राऊतांनी विचारला.

“सामान्य शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेवर पाठवायचं ठरवलं आहे. पक्षासाठी, सामान्य जनतेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना लोकांचं प्रतिनिधीत्व करता यावं, यासाठी संजय पवारांची निवड करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाचा आम्हा सर्व शिवसैनिकांना अभिमान आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.