मुंबईतील सायन ब्रीज दुरुस्तीच्या कामासाठी 3 दिवस बंद, 72 तासांनी खुला होणार

सायन पोलीस स्टेशन समोरील नानालाल मेहता उड्डाणपूल तीन दिवस बंद राहणार आहे (Nanalal Mehta bridge close).

मुंबईतील सायन ब्रीज दुरुस्तीच्या कामासाठी 3 दिवस बंद, 72 तासांनी खुला होणार
| Edited By: | Updated on: Oct 17, 2020 | 8:36 AM

मुंबई : सायन पोलीस स्टेशन समोरील नानालाल मेहता उड्डाणपूल तीन दिवस बंद राहणार आहे (Nanalal Mehta bridge close). हा पूल काल (16 ऑक्टोबर) रात्री 11 वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दादरकडे जाणारी वाहतूक उड्डाणपुलाच्या खालून वळवण्यात आली आहे (Nanalal Mehta bridge close).

शीव आणि माटुंग्याला जोडणाऱ्या या उड्डाणपुलाच्या सांध्यामधील काही लोखंडी प्लेट तुटल्या आहेत. वाहतूक पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती तत्काळ महापालिकेला दिली. त्यानुसार पालिकेने पाहणी करून तत्काळ दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार काल रात्री 11 वाजल्यापासून दादरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

या उड्डाणपुलाचे काम एकूण 72 तासात पूर्ण होणार असल्याची माहिती पालिकेने वाहतूक पोलिसांना दिली आहे. काम सुरू असल्या दरम्यान वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे सायनवरुन मुंबईकड़े जाणाऱ्या प्रवाशांना थोड़ा फार त्रास सहन करावा लागणार.

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी मोठ्या गाड्या पुलाखालून डायव्हर्ट केल्या आहेत. उपनगरातून मुंबईत जाणाऱ्या ट्रॅफिकवर याचा परिणाम होत आहे.

संबंधित बातम्या :

नवरात्रोत्सवात सोशल डिस्टन्सिंग, कोरोना नियमांचे पालन करा, अजित पवारांचं जनतेला आवाहन

…म्हणून तूर्तास महिलांना लोकलनं प्रवास करता येणार नाही