डोक्याला दुखापत, कंबरेपाशी चिरफाड, नंतर मृतदेहांचीही अदलाबदल, मुंबईतील सायन रुग्णालयाचा प्रताप

| Updated on: Sep 14, 2020 | 7:56 AM

सायन रुग्णालयातील या घोळबाबत दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने एक पत्रक काढून दिली आहे

डोक्याला दुखापत, कंबरेपाशी चिरफाड, नंतर मृतदेहांचीही अदलाबदल, मुंबईतील सायन रुग्णालयाचा प्रताप
Follow us on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा (Sion Hospital Dead Body Exchange) एकदा समोर आला आहे. एका मृतकाचे शव दुसऱ्या मृतकाच्या नातेवाईकाला दिल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. या प्रकरणी कारवाई करत रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली (Sion Hospital Dead Body Exchange).

नेमकं प्रकरण काय?

वडाळा येथे रहाणारा अंकुश सूरवाडे या 27 वर्षीय तरुणाचा 28 ऑगस्ट रोजी अपघात झाला होता. त्याला सायन रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले होते. काल (13 सप्टेंबर) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, त्याच्या डोक्याला दुखापत असताना त्यांच्या कम्बरेजवळ चिरफाड करण्यात आली होती. याबाबत नातेवाईकांनी त्याची किडनी काढून घेतल्याचा आरोप डॉक्टरांवर केला.

हे प्रकरण सुरु असताना शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह नेण्यात आला. परंतु तिथे अंकुश बरोबर एक आणखी मृतदेह आला होता. यावेळी त्या मृतकाच्या नातेवाईकांना अंकुशचा मृतदेह देण्यात आला. ज्याच्यावर त्यांनी घरी नेऊन अंत्यसंस्कारही केले. मात्र, अंकुशच्या कुटुंबाच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी मित्र मंडळींसह सायन रुग्णालयात हंगामा केला. तिथून ते थेट सायन पोलीस ठाण्यात गेले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, तमिल सेलव्हन आणि अनेक स्थानिकही तेथे उपस्थित होते.

या प्रकरणी सायन पोलिसांनी जबाब नोंदविले असून पुढील कारवाई सुरु आहे. तर सायन रुग्णालयातील या घोळबाबत दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने एक पत्रक काढून दिली आहे.

Sion Hospital Dead Body Exchange

संबंधित बातम्या :

मनसेचा दणका, नवी मुंबईत खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 32 लाख रुपये रुग्णांना परत

मुंबईत ‘कोरोना’ पुन्हा डोके वर काढण्याची भीती, दहा दिवसात डबलिंग रेट 84 वरुन 58 वर

“क्लिनिक उघडण्याची सक्ती, मात्र विमा नाकारला” डॉक्टरांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला