AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smart Ration Card: आता स्मार्ट रेशन कार्ड… एकच खतरनाक युक्ती आणि बोगस लाभार्थ्यांना असा आळा बसणार, अपडेट काय?

Smart Ration Cards: राज्यातील जुन्या कागदी शिधापत्रिका आता हद्दपार होतील. नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञाना आधारे स्मार्ट रेशन कार्ड वितरीत करण्यात येणार आहे. यातील एका गोष्टीमुळे बोगस लाभार्थ्यांना चाप बसणार आहे.

Smart Ration Card: आता स्मार्ट रेशन कार्ड... एकच खतरनाक युक्ती आणि बोगस लाभार्थ्यांना असा आळा बसणार, अपडेट काय?
आता स्मार्ट रेशन कार्ड
| Updated on: Jul 07, 2026 | 5:30 PM
Share

Smart Ration Cards: राज्य सरकारने अन्नधान्य वितरण प्रणालीत अमुलाग्र बदल करण्यासाठी पाऊल टाकले आहे. त्यातंर्गत राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका (Smart Ration Card) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मार्ट रेशन कार्ड देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जुन्या कागदी शिधापत्रिका लवकरच हद्दपार होतील. रेशन कार्ड फाटणे अथवा खराब होण्यासारख्या नेहमीच्या कटकटीतून लाभार्थी आणि प्रशासनाची एकदाची सुटका होईल. तर बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

रेशन कार्डला स्वतंत्र क्यूआर कोड

प्रत्येक रेशन कार्डवर स्वतंत्र क्यूआर कोड असेल. यामुळे लाभार्थ्यांची माहिती तात्काळ पडताळा करता येईल. काळाबाजाराला आळा घालता येईल. क्यूआर कोड स्कॅनिंगमुळे बोगस लाभार्थ्यांचे पितळ तर उघडे पडलेच. पण हे रेशन कार्ड आधार कार्डशीही जोडल्या जाणार असल्याने जे सरकारी अधिकारी, कर्मचारी अथवा बड्या घरातील सदस्य या योजनेचा लाभ घेत आहेत, ते समोर येतील. त्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळता येतील. अशा लाभार्थ्यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा प्रशासनाला करता येईल.

क्यूआर कोड स्कॅन झाल्याने लाभार्थ्यांची माहिती तात्काळ पडताळली जाईल. रेशन वाटपाचे, वितरणाचे काम झटपट होईल. दुकानांवरील रांगा कमी होईल. रेशनिंगच्या प्रक्रियेतील वेळ आणि विलंब टाळता येईल. तर रेशनिंग दुकानांवरील गडबडी थांबण्यास मदत होईल. क्यूआर कोडमध्ये संबंधित रेशनधारकाच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती, त्यांना देण्यात येणारे धान्य आणि इतर तपशील एका क्लिकवर मंत्रालयापासून ते जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना पाहता येईल.

वन नेशन, वन रेशन कार्डमधील महत्त्वाचा टप्पा

देशभरात लवकरच वन नेशन, वन रेशन कार्ड मिशन राबवण्यासाठी स्मार्ट रेशन कार्ड अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नवीन स्मार्ट रेशन कार्ड टिकाऊ प्लास्टिक अथवा पीव्हीसी मटेरियलपासून तयार करण्यात येणार आहे. ते पाण्यात भिजण्याची, फाटण्याची अथवा खराब होण्याची चिंता नसेल. तर हरवल्यास ते तयार करणेही सोपे असेल. क्यूआर कोड थेट शासकीय डेटाबेसशी जोडल्या जाणार असल्याने धान्याचा काळाबाजार थांबवता येणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?