AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9 रिक्षा, 4 कार आणि एक टेम्पो… बसने भररस्त्यात धाड धाड उडवले, मुंबईकर हादरलेच

अंधेरीत भरधाव बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत १३ गाड्यांचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.

9 रिक्षा, 4 कार आणि एक टेम्पो… बसने भररस्त्यात धाड धाड उडवले, मुंबईकर हादरलेच
andheri best bus accident
| Updated on: Jul 10, 2026 | 8:18 PM
Share

बेस्टच्या भरधाव बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने या बसने १४ गाड्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना अंधेरी एस.व्ही. रोड येथे घडली आहे. या प्रकरणात एकूण १४ वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेत ६ ते ८ जण जखमी झाल्याने  त्यांना कूपर रुग्णालयास विविध रुग्णालयात दाखल केले आहे. ही बस मिल्लत नगरहून अंधेरी बसस्थानकाकडे जात असताना सीझर रोडजवळ हा विचित्र अपघात घडला आहे. बस चालक आणि वाहकाला चौकशीसाठी डी.एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. या अपघातात  ९ रिक्षा, ४ कार आणि १ तीन चाकी टेम्पोचे नुकसान झाले आहे.

टिळक नगर ते अंधेरी स्थानक (पश्चिम ) बेस्ट बस क्रमांक २४२ या मार्गावरील बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने या बसने अंधेरी येथील १४ गाड्यांना धडक दिल्याने अनेक सहा ते आठ जण यात जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेत ९ रिक्षांचे चार कारचे आणि एका तीन चाकी टेम्पोचे नुकसान झाल्याची माहिती उघड झाली आहे. या बेस्ट चालक आणि वाहकाला चौकशीसाठी डी.एन.नगर  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  गेल्या काही महिन्यात बेस्टच्या चालकांच्या चुकीमुळे अनेक अपघात घडले आहेत. त्यातील बहुतांशी अपघात कंत्राटी चालकांच्या चुकीमुळे घडले आहेत. ही बस देखील वेटलिज बस असून सांताक्रुझ डेपोतील मातेश्वरी या कंत्राटदाराची आहे. तसेच या प्रकरणातील चालक साहिल सावंत ( ३० ) आणि वाहक किरण चव्हाण ( ३५ )  हे दोघेही कंत्राटी कामगार आहेत.

 रिव्हर्स घेताना पादचाऱ्याला चिरडले

नुकताच भांडुप कोकण नगर येथे बेस्टची मोठी बस रिव्हर्स घेताना एका प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावल्याची घटना ८ जुलै रोजी घडली होती. प्रवाशांनीच या बसला धक्का मारुन पुढे नेल्याने या पादचारी प्रवाशाचे प्राण सुदैवाने बचावले होते. मंगतराम पेट्रोल पंप येथे रस्ता अरुंद असल्याने येथे मोठ्या आकाराच्या बसना मागे वळवताना अडचण होते अशी तक्रार बसचालकांनी अनेकदा केली आहे.

Follow Us
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी