Sputnik vaccine : स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बो कोल्ड स्टोरेज उभारणार : महापौर किशोरी पेडणेकर

| Updated on: Jun 08, 2021 | 12:01 PM

रशियन लस स्पुतनिकसाठी (sputnik vaccine) मुंबईत जम्बो कोल्ड स्टोरेज उभारणार (Mumbai cold storage) असल्याची माहिती, महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी दिली.

Sputnik vaccine : स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बो कोल्ड स्टोरेज उभारणार : महापौर किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
Follow us on

मुंबई : कोरोनावरील रशियन लस स्पुतनिकसाठी (sputnik vaccine) मुंबईत जम्बो कोल्ड स्टोरेज उभारणार (Mumbai cold storage) असल्याची माहिती, महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी दिली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईतील लसीकरणासह विविध विषयावर भाष्य केलं. (sputnik vaccine in mumbai mayor Kishori Pednekar said will build cold storage near kanjurmarg )

मुंबईत स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी विशेष कोल्ड स्टोरेजच्या जागेची चाचपणी सुरु केली आहे. कांजुरमार्गसारखेच विशेष कोल्ड स्टोरेज उभारण्याचे मुंबई महापालिकेचे प्रयत्न आहेत. मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरांसाठी सोयीस्कर जाईल अशा जागी स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी जम्बो कोल्ड स्टोरेज उभारणार, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

स्पुतनिकसाठी मुंबई अद्याप रेड्डीज लॅबवर अवलंबून आहे. स्पुतनिकच्या कोल्ड स्टोरेजचा प्रश्न आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

“भारतात लसीच्या 5 कंपनी आहेत, पण रेड्डीज अशी एकमेव कंपनी आहे, ज्याला परवानगीदेखील आहे, ते पुरवठादेखील करु शकतात. रेड्डीज लॅबोरेटरी आहे त्यांचं म्हणणं आहे आमचं कोल्डस्टोरेज आहे त्यांना देणार आहोत. खेड्यापाड्यात हे स्टोरेज देता येतील असं सांगितले आहे. आपल्याला घेता येईल याबाबत आपण बघतो आहोत. कंजूरमार्गचं कोल्डस्टोरेज आहे तिथे कोव्हिशिल्ड लसीचा साठा केला जातो. पण रेड्डीजने लस दिली तर आपण पाहणी करत आहोत, ईस्टर्न आणि वेस्टर्नला लस साठवता येईल का यावर चर्चा केली जाईल”, असं महापौर पेडणेकर म्हणाल्या.

लहान मुलांवर लसीचे प्रयोग

नागपूरमध्ये मेडिकल कॉलेजला लहान मुलांवर लसीचे प्रयोग केले जात आहेत. मुंबई महापालिकेला अशी परवानगी मिळावी यासाठी केंद्राकडे आधीच संपर्क केला आहे. मात्र अद्याप परवानगी मिळाली नाही, अशी माहिती महापौरांनी दिली.

मुख्यमंत्री-पंतप्रधान भेट

किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “आजच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे मुंबईचं विशेष लक्ष आहे. या भेटीतून मुंबईसाठी लसीकरणाबाबत सकारात्मक बातमी मिळावी ही अपेक्षा आहे”

मुंबईतील नालेसफाईबाबत बैठक

आज 4 वाजता नालेसफाईबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष बैठक होईल. विरोधकांसारखे नुसतेच आरोप करण्यापेक्षा समोरच्या आव्हानांवर उपाययोजना शोधल्या जातील. मान्सूनपूर्व तयारी, नालेसफाई यांबाबत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या  

Sputnik V लस मुंबई-पुण्यात कधी दिली जाणार? लस कुठे आणि किती रुपयांना मिळणार?

मोठी बातमी: भारताला मोठा दिलासा; नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी

(sputnik vaccine in mumbai mayor Kishori Pednekar said will build cold storage near kanjurmarg )