AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मत चोरीवर ‘सर्जिकल स्ट्राइक’; राहुल गांधी यांच्या नंतर महाराष्ट्रात हा नेता करणार धमाका

Vote Theft Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मत चोरीचा गंभीर आरोप करत आहेत. त्यांनी त्याविषयीचे पुरावे पण सादर केले आहेत. तर आता महाराष्ट्रातील हा नेता पण मोठे खुलासे करणार आहे.

मत चोरीवर 'सर्जिकल स्ट्राइक'; राहुल गांधी यांच्या नंतर महाराष्ट्रात हा नेता करणार धमाका
मत चोरीवर सर्जिकल स्ट्राईक
| Updated on: Sep 25, 2025 | 2:11 PM
Share

Aditya Thackeray on Vote Theft : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी गेल्या दोन पत्रकार परिषदेत याविषयीचे पुरावे सादर केले. तर लवकरच मत चोरी प्रकरणात हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचा त्यांचा दावा आहे. तर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत उद्धव सेनेचे आदित्य ठाकरे हे सु्द्धा मत चोरीविरोधात आवाज उठवणार आहे. आपण मत चोरीप्रकरणात सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

मुंबईत एका कार्यक्रमात आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्यानंतर आपणही महाराष्ट्र विधानसभेतील मत चोरीबद्दल खुलासा करू असे आदित्य ठाकरे म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील मत चोरी प्रकरणात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे ते म्हणाले. आम्ही गेल्या निवडणुकीत मतदारांची अचानक वाढलेली संख्या, मतदार यादीतून गायब झालेले मतदार, मतदान केंद्रावरील अव्यवस्थेविषयी तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्व अनियमिततेबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याचे ते म्हणाले.

कधी करणार खुलासा?

तर मत चोरीप्रकरणात आदित्य ठाकरे केव्हा खुलासा करणार याची उत्सुकता लागली आहे. ते कधी मत चोरीविषयीचा खुलासा करणार याविषयी त्यांना विचारण्यात आले. तेव्हा मत चोरीवर सर्जिकल स्ट्राईक होणार आहे. पण सध्या ती कधी करणार याचा त्यांनी खुलासा करणार नाही. त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीविषयी सुद्धा मत व्यक्त केले आहे. आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, या प्रक्रियेत आम्हाला अनेक त्रुटी आढळल्या. त्याविषयीचा अभ्यास सुरू आहे. लवकरच मत चोरीचा खुलासा करणार असल्याचे ते म्हणाले. जनतेच्या दरबारात आमची बाजू मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब

राहुल गांधीं हे बिहार निवडणुकीपूर्वी हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची शक्यता आहे. त्यांनी मत चोरीविषयी आतापर्यंत दोन पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यात त्यांनी कर्नाटकमधील काही मतदार संघात मत चोरी झाल्याचा आरोप केला आहे. त्याविषयीचे खुलासेच नाही तर पुरावे पण त्यांनी सादर केले. या पुराव्या दाखल यावेळी तर त्यांनी काही मतदार सुद्धा समोर आणले. त्यांनी तक्रार केली नसतानाच शेजारच्या व्यक्तीचे नाव यादीतून वगळल्याचे त्यांनी समोर आणले होते. तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...