सुशांतसिंह राजपूतचा मॅनेजर ऋषिकेश पवारला बेड्या, ड्रग्ज प्रकरणात कारवाई

ऋषिकेश पवारच्या विरोधात अनेक पुरावे एनसीबी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. (Sushant Singh Rajput Manager arrested)

सुशांतसिंह राजपूतचा मॅनेजर ऋषिकेश पवारला बेड्या, ड्रग्ज प्रकरणात कारवाई
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 11:51 AM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात त्याच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील चेंबुरमध्ये राहणाऱ्या ऋषिकेश पवारला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चौकशीसाठी समन्स बजावल्यापासून ऋषिकेश फरार झाला होता. (Sushant Singh Rajput Manager Rishikesh Pawar arrested)

ऋषिकेशची हार्ड डिस्क एनसीबीकडून जप्त

सुशांतसिंह राजपूतचा मॅनेजर ऋषिकेश पवारला अटक झाली आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी धाडही टाकली होती. त्यावेळी त्याच्या घरातील लॅपटॉपमध्ये महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्यानंतर ऋषिकेशची हार्ड डिस्क एनसीबी अधिकाऱ्यांनी जप्त केली होती.

ऋषिकेश पवार फरार घोषित

ऋषिकेश पवारच्या विरोधात अनेक पुरावे एनसीबी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. अटक टाळण्यासाठी ऋषिकेशने सेशन्स कोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यानंतर त्याला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावलं होतं, मात्र तेव्हापासून त्याचा पत्ता नव्हता. एनसीबी अधिकारी ऋषिकेश पवारचा शोध घेत होते. गुन्हा क्रमांक 16/20 यातला तो फरार आरोपी होता.

सुशांतच्या ड्रीम प्रोजेक्टवर मॅनेजर

अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते. त्या प्रोजेक्टवर ऋषिकेश हा मॅनेजर म्हणून काम करत होता. सुशांतचा नोकर दीपेश सावंत याच्या चौकशीतही ऋषिकेश पवारचं नाव आलं होतं.

मुंबईमध्ये काही दिवसांपासून ड्रग्ज माफियांविरोधात धडाकेबाज कारवाई सुरु आहे. नुकतीच मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्जविरोधात मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारात 2 कोटी 40 लाख रुपये किंमत असणारे 1 किलो 200 ग्रॅम ड्रग्ज जप्त केलं होतं. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने ही मोठी कारवाई केली असून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आलं.

संबंधित बातम्या :

धारावीतून 2 कोटींचे ड्रग्ज जप्त, NCBची धडाकेबाज कारवाई

“होय, मी ड्रग्ज घेतलं” रिया चक्रवर्तीची एनसीबीच्या चौकशीत कबुली

(Sushant Singh Rajput Manager Rishikesh Pawar arrested)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.