महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अभिनेत्री स्वरा भास्करचा पुढाकार, मदतीचं आवाहन

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतलाय. तिने आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत सर्वांना मदत करण्याचं आवाहन केलंय.

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अभिनेत्री स्वरा भास्करचा पुढाकार, मदतीचं आवाहन


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतलाय. तिने आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत सर्वांना मदत करण्याचं आवाहन केलंय. यात तिने कोणतीही मदत लहान मोठी नसते असं नमूद करत मदतीचं आवाहन केलंय. तसेच सद्यस्थितीत महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या सर्वांना सलाम केलाय.

स्वरा भास्कर म्हणाली, “महाराष्ट्रातील गरजू पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या सर्वांना सलाम. कोणतीही मदत लहान किंवा मोठी नाहीये. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठं काम करणाऱ्या युथ फॉर डेमॉक्रसीला मदत करावी. कृपया दान करा.”

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोहिम

स्वरा भास्करने आपल्या ट्विटसोबत क्राऊड फंडिग जमा करणाऱ्या मिलाप या प्लॅटफॉर्मची लिंकही शेअर केलीय. यात युथ फॉर डेमॉक्रसीने सुरू केलेल्या मोहिमेची माहिती देण्यात आलीय. आतापर्यंत शेकडो लोकांनी या मोहिमेचा भाग होत देणगी दिलीय.

‘पूरप्रवाहाच्या अंती उभ्या माणुसकीच्या भिंती’, युथ फॉर डेमोक्रसीकडूनही आवाहन

यूथ फॉर डेमॉक्रसीने म्हटलं आहे, “आपल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त बांधवांसाठी आता आपण आपले बहुमोल योगदान ‘युथ फ\र डेमोक्रेसी’च्या माध्यमातून आमच्या अधिकृत खात्यावर जमा करू शकता. आपल्या मार्फत केल्या गेलेल्या सर्व योगदानाचे अपडेट्स YFD मार्फत 15 दिवसांच्या कालावधीत आमच्या सोशल मिडिया पेजवर पोस्ट केले जातील.”

हेही वाचा :

Cold Blooded Murder!, स्टॅन स्वामींच्या निधनानंतर स्वरा भास्करची संतप्त प्रतिक्रिया

वाद विवाद आणि स्वरा भास्कर, जाणून घ्या काही खास गोष्टी

‘देश आई, तर शेतकरी बाप आहे’, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कलाकारही एकवटले

व्हिडीओ पाहा :

Swara Bhaskar appeal to help Maharashtra Flood affected people Chiplun Mahad

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI