
मुंबई | 21 जानेवारी 2024 : मुंबईमध्ये आज टाटा मॅरेथॉन पार पडली. दरवर्षी प्रमाणे या यावर्षी ही मुंबई टाटा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. देश विदेशातील हजारो नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी नोंदवला आहे. माहीम रेती बंदर इथून हॉफ मॅरेथॉनला सुरवात झाली. माहीम-वरळी सीलिंक -हाजी आली करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं ही मॅरेथॉन संपली. एकूण 21 किलोमीटरची ही रण होती. त्यासाठी आता हजारो स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला. यात सहभागी झालेल्यांनी 10 किलोमीटर अंतर धावत पार केलं. टाटा मुंबई मॅरेथॉनचं यंदाचं हे 19 वं वर्षं आहे.
आज मुंबईत सकाळी ही मॅरेथॉन पार पडली. 42 किलोमीटरच्या पूर्ण मॅरेथॉनला सकाळी 5 वाजता सुरवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ह्या आजच्या पहिल्या मोठ्या फुल मॅरेथॉनला झेंडा दाखवला आहे. मुंबई मॅरेथॉन ही मुंबईची जाण आहे. स्पर्धकांचं स्पिरीट पाहायला मिळत आहे. मी सध्या व्यायाम करतो पण धावायला वेळ मिळत नाही. माझी सध्या वेगळी रन सुरु आहे. यंदा सुरु असलेली ड्रीम रन संपली की, पुढच्या वर्षी धावण्याच्या प्रयत्न करेन, असं राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉन पार पडली. यामध्ये 1 हजार 10 पुरुष तर 722 महिलांनी सहभाग घेतला. मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मॅरेथॉनला मिळत आहे. अनेकांच्या हातात श्रीरामाचे झेंडे देखील पाहायला मिळत आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये ड्रीम रनच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश स्पर्धकांकडून दिले जात आहेत. मुंबई मॅरेथॉन चक्क श्रीराम-लक्ष्मणच्या वेशभूशेत स्पर्धक अवतरले आहेत.
मुंबई मॅरेथॉनमध्ये जय श्रीराम गाण्याची धूम पाहायला मिळाली. मुंबई मॅरेथॉनमध्ये जय श्री रामाचे नारे देण्यात आले. हाती भगवा झेंडा घेऊन शंक नाद करत स्पर्धक मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या ड्रीम रनमधील स्पर्धकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
पूर्ण मॅरेथॉन (पुरुष)
१) हायली लेमी, २:०७:५०
इथोपिआ
२) हेमानॉट अल्यू, ०२:०९:०३ इथोपिआ
३) मित्कु तफा, ०२:०९:५८ इथोपिआ
पूर्ण मॅरेथॉन (महिला)
१) अबेराश मिनसिवो, ०२:२६:०६ इथोपिआ
२) मूलूअबट तेसगा, ०२:२६:५१ इथोपिआ
३) मेधिन बेजेनी, ०२:२७:३४ इथोपिआ
पूर्ण मॅरेथॉन (भारतीय गट)
१) श्रिनु बुगाथा, २:१७:२९
२) गोपी थोनकल, २:१८:३७
३) शेरसिंह तन्वर, २:१९:३७
अर्ध मॅरेथॉन (पुरुष)
१) सावन बरवाल
१तास ५ मिनटे ७ सेकंद
२) किरण म्हात्रे
१ तास ६ मिनटे २३ सेकंद
३) मोहन सैनी
१ तास ६ मिनटे ५५ सेकंद
अर्ध मॅरेथॉन (महिला)
१) अमरीता पटेल,
१ तास १९ मिनटे २० सेकंद
२) पूनम दिनकर
१ तास १९ मिनटे २० सेकंद
३) कविता यादव
१ तास २० मिनटे ४५ सेकंद