Tejas Thackeray | ‘बोईगा ठाकरे’नंतर तेजस ठाकरेंनी पालीची दुर्मिळ प्रजाती शोधली

| Updated on: Jun 19, 2020 | 3:59 PM

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लहान मुलगा तेजस ठाकरे यांनी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला आहे.

Tejas Thackeray | बोईगा ठाकरेनंतर तेजस ठाकरेंनी पालीची दुर्मिळ प्रजाती शोधली
Follow us on

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा (Tejas Thackeray Team Discovered New Gecko Species) लहान मुलगा तेजस ठाकरे यांनी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला आहे. तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकरांच्या टीमने पालींच्या या दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे (Tejas Thackeray Team Discovered New Gecko Species).

कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पच्छिम घाटातील जैववैविधतेत भर पडली आहे. भारतात वेगवेगळ्या पन्नास पालींच्या प्रजाती आढळतात. त्यात आता डोळ्यांच्या गोलाकार मोठ्या बुबळांच्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरीररचनेमुळे प्राणीतज्ञांचं लक्ष वेधून घेत आहेत.

तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी 2014 मध्ये या पालींच्या प्रजातीचा शोध लावला होता. मात्र, गेली पाच वर्षे या दुर्मिळ प्रजातींच्या पालींवर जुणूकीय तसेच इतर पालींपैक्षा या वेगळ्या का आहेत यावर प्राणी शरीर शास्त्रांच्या नियमानुसार अनेक सविस्तर संशोधन करण्यात आलं.

या नव्याने शोधण्यात आलेल्या दुर्मिळ पालीचं नाव ‘मँग्निफिसंट डवार्फ गेको’ (Magnificent Dwarf Gecko) असं ठेवण्यात आलं आहे. या चारही तरुणांच्या संशोधक टीमने या नव्या प्रजातींच्या पालीवर केलेला शोधनिबंध आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या “झुटाक्सा” या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे (Tejas Thackeray Team Discovered New Gecko Species).

तेजस ठाकरेंनी 9 महिन्यांपूर्वी सापाची नवी प्रजाती शोधली

गेल्या 9 महिन्यांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात तेजस ठाकरेंनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला होता. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ (Snake Boiga Thackeray) असं ठेवण्यात आलं होतं.

सापाच्या या प्रजातीचं नाव तेजस ठाकरे यांच्या नावावरुन देण्यात आलं. या सापाच्या प्रजातीचा शोध तेजस ठाकरे यांनी लावला होता, त्यामुळे या सापाच्या प्रजातीला त्यांचं नाव देण्यात आलं.

त्यापूर्वी तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्रात आढळणाऱ्या पालींच्या दोन नव्या प्रजाती शोधून काढल्या होत्या. या पाली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळून आल्या. सातारा जिल्ह्यातील कोयना खोऱ्यात सापडलेल्या पालीच्या प्रजातीला ‘निमस्पिस कोयनाएन्सिस’ आणि आंबाघाटात सापडलेल्या प्रजातीला ‘निमस्पिस आंबा’, असं नाव देण्यात आलं (Tejas Thackeray Team Discovered New Gecko Species).

संबंधित बातम्या :

तेजससोबत फोटोसाठी आग्रह, उद्धव म्हणाले, मला स्टुलावर उभं राहावं लागतं!

तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया