मोर्चा कुठून कुठे निघणार? राज ठाकरे यांची सरकारला घाम फोडणारी घोषणा

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधूंनी 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत महामोर्चा आयोजित केला आहे. भायखळ्याहून छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत निघणाऱ्या या संयुक्त मोर्चाची घोषणा राज ठाकरे यांनी केली. हा मोर्चा लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी असून, यात कोणताही राजकीय झेंडा किंवा घोषणा नसतील, केवळ तिरंगा दिसेल.

मोर्चा कुठून कुठे निघणार? राज ठाकरे यांची सरकारला घाम फोडणारी घोषणा
| Updated on: Sep 29, 2026 | 12:31 PM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्याच्या विरोधात ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. भायखळ्याहून हा मोर्चा निघणार असून छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मुंबई महापालिकेच्या समोर या मोर्चाची सांगता होणार आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी राज ठाकरेंनी मोर्चाची सविस्तर माहिती दिली. येत्या 4 ऑक्टोबर रोजी आमचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. 4 तारखेला सकाळी 10 वाजता सर्वजण भायखळ्याच्या रिचर्डसन आणि क्रुडास कंपनीजवळ जमतील. तिथून 11 ते 11.30 वाजेच्या दरम्यान मोर्चा निघेल. हा मोर्चा छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाजवळ येईल. या ठिकाणी व्यासपीठ उभारलं जाईल. तिथेच सभेत रुपांतर होऊन मोर्चाची सांगता होणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

Loading...

सभेतच बोलू

यावेळी राज ठाकरे यांनी कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देणं टाळलं. जे काही बोलायचं ते आम्ही मोर्चाच्या दिवशीच बोलू. आता काही बोलणार नाही. हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधातील आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मतदानातील घोळावर बोलत आहोत. आम्ही निवडणूक आयोगकडे तक्रारीही केल्या होत्या. त्याची दखल घेतली नाही. हा मोर्चा आमच्या आणि मतदारांच्या अपमानाच्या विरोधातील आहे. त्यावर आम्ही येत्या 4 तराखेलाच सविस्तर बोलणार आहोत, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

कोणतेही झेंडे आणू नका…

या मोर्चात राजकीय पक्षांचे झेंडे नसतील. फक्त तिरंगा असेल. हा मोर्चा राजकीय नाही. लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा हा विषय आहे. त्यामुळे या मोर्चात कोणतेही राजकीय झेंडे नेण्यात येणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या घोषणाही दिल्या जाणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विरोधकांना फोन करणार

दरम्यान, या मोर्चात विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांना बोलावणार का? असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर विरोधकांना पत्र पाठवणार नाही. पण सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आम्ही फोन करून मोर्चात येण्याचं आवाहन करणार आहोत, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us