
मुंबई उच्च न्यायालयात एक वेगळ्याच प्रकारची प्रकरण दाखल झाले आहे. या प्रकरणात एका असहाय मातेने मुलाच्या स्पर्मसाठी कोर्टात धाव घेतली आहे. संबंधित मृत युवकाचे फ्रीज केलेले वीर्य या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत सुरक्षित सांभाळून ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका फर्टीलिटी सेंटरला दिले आहेत.
याचिकाकर्ता महिलेचा मुलाला कॅन्सर झाला होता. कॅन्सरशी झंजताना त्यात मुलाचा मृत्यू झाला. त्याने त्याचे स्पर्म फ्रीज करुन सांभाळून वीर्य बँकेत ठेवले होते.परंतू या मुलाच्या मृत्यूनंतर फर्टीलिटी सेंटरने त्याच्या आईला सीमन देण्यास नकार दिला. त्यामुळे या दुर्देवी मुलाच्या आईने कोर्टात धाव घेतली आहे.
जस्टीस मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी न्यायमूर्ती म्हणाले की जर सुनावणी पूर्ण होण्याआधी जर संबंधी तरुणाचे सीमन खराब झाले किंवा नष्ट केले गेले तर याचिकेचा हेतूच नष्ट होईल त्यामुळे या फर्टीलिटी सेंटरला ही याचिका निकाली निघेपर्यंत तरुणाचे सीमन सांभाळून ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.
याचिकेत महिलेने म्हटलेय की तिचा मुलाला कॅन्सर झाल्याचे कळले तेव्हा एका ऑन्कोलॉजिस्टने वीर्य फ्रीज करण्याचा सल्ला दिला होता. कारण केमोथेरपीने नंपुसकता होण्याची भीती असते. मुलाने कुटुंबाचा सल्ला न घेता परस्पर एका फॉर्मवर सही करीत हा पर्याय निवडला की त्याच्या मृत्यूनंतर हे स्पर्म नष्ट करावे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला हा तरुण कोणतेही इच्छापत्र न लिहीता मृत्यू पावल्याने आता फर्टीलिटी सेंटरने स्पर्म देण्यास नकार दिला आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची साल मे २०२२ मध्ये निर्घृन हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली होती. सिद्धू मुसेवाला हा एकुलता एक मुलगा गमावल्याने त्याचे आई-वडील प्रचंड दु:खी झाले होते. त्यानंतर सिद्धूच्या आईने 58 व्या वर्षी आयव्हीएफ तंत्राने मुलाला जन्म दिला होता.