राज्यात उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद, फक्त रुग्णांसाठीच ऑक्सिजन मिळणार

| Updated on: Apr 09, 2021 | 3:21 PM

राज्यातील ऑक्सिजनचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आता फक्त वैद्यकीय गजरेसाठीच ऑक्सिजन उप्तादन करावं, असे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद, फक्त रुग्णांसाठीच ऑक्सिजन मिळणार
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. विविध शहरातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय. अशावेळी रुग्णालयात बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील ऑक्सिजनचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आता फक्त वैद्यकीय गजरेसाठीच ऑक्सिजन उप्तादन करावं, असे आदेश देण्यात आले आहेत. तशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिलीय. (The oxygen supply of the industry has been cut off, now only oxygen will be supplied to the patients)

आता ऑक्सिजन निर्मिती फक्त रुग्णांसाठी

राज्यात सध्या 80 टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी तर 20 टक्के हा उद्योगांसाठी देण्याचे आदेश कंपन्यांना दिले होते. पण त्यात आता लवकरच बदल केले जाणार आहे. आता 100 टक्के ऑक्सिजन हा फक्त वैद्यकीय वापरासाठी देण्याचे आदेश कंपन्यांना दिले जाणार असल्याची माहिती शिंगणे यांनी दिलीय. ऑक्सिजनच्या निर्मितीला वेळ आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागतं. येत्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्य राज्यातून ऑक्सिजन मिळवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहितीही शिंगणे यांनी दिलीय.

अन्य राज्यांकडून ऑक्सिजन घेतला जाणार

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विविध उद्योगांना केला जाणारा ऑक्सिजन पुरवठा आता थांबवला जाणार आहे. फक्त वैद्यकीय गरजेसाठीच ऑक्सिजन उत्पादन केलं जाणार आहे. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गेल्य काही दिवसांत राज्यात काही भागात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. राज्यात ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या अने कंपन्या असल्या तरी 7 ते 8 कंपन्यांमध्येच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचं उत्पादन घेतलं जातं. त्या कंपन्यांना टँकर्स आणि वाहतुकीबाबत सर्व मदत सरकारकडून दिली जात आहे. राज्यात 12 हजार 87 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उप्तादन घेतलं जातं. आता रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढतेय. अशावेळी मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगडमधून ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे’.

रेमडेसिव्हीरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रयत्न

राज्यात सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. तो रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी इंजेक्शन निर्मिती कंपन्यांशी नुकतीच बैठक घेतली. त्यात रेमडेसिव्हीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक आणि काळा बाजार होऊ नये म्हणून इंजेक्शनवरील MRP कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनचं काऊंटडाऊन सुरू; वाचा, संपूर्ण नियमावली काय?

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आठवले म्हणतात, राज्य सरकार गलथान, 5 लाख लसी फुकट घालवल्या

The oxygen supply of the industry has been cut off, now only oxygen will be supplied to the patients