मध्य रेल्वेवर सलग तीन रात्र पॉवर ब्लॉक, विद्याविहार येथे पादचारी पुलाचे गर्डर लाँचिंग, वाहतूकीत काय बदल ?
शनिवारी रात्री मध्य रेल्वेच्या कुर्ला ते भांडुप स्थानकादरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार स्थानकावर मधल्या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. विद्याविहार स्थानकावर विशेष वाहतूक ब्लॉक आणि वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे आज रात्री बारा वाजल्यापासून सकाळी ४.४० पर्यंत ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकादरम्यान मधल्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याकरिता विद्याविहार स्थानकावर महत्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी कुर्ला (स्टेशन वगळून) ते भांडुप (क्रॉसओव्हर वगळून) शनिवारपासून सलग तीन रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार रात्री हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विद्याविहार स्थानकावरील मधल्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याकरिता खालील तपशिलानुसार १५ – १६ मे (शुक्रवार-शनिवार रात्री), १६-१७ मे (शनिवार-रविवार रात्री) आणि १७- १८ मे (रविवार-सोमवार रात्री) रोजी विद्याविहार स्थानकावर कुर्ला- ते भांडुप विभागात विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉकची तारीख आणि कालावधी:
* दिनांक १५- १६ मे रोजी रात्री ०१.१५ ते सकाळी ०४.१५ वाजेपर्यंत
* दिनांक १६- १७ मे रोजी रात्री ००.१० ते सकाळी ०४.४० वाजेपर्यंत
* दिनांक १७- १८ मे रोजी रात्री ०१.१५ ते पहाटे ०३.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
ब्लॉक विभाग: कुर्ला (स्टेशन वगळून) ते भांडुप (क्रॉसओव्हर वगळून) या दिवशी:
* दिनांक १६ मे २०२६ रोजी अप आणि डाऊन धिम्या मार्गावर (शुक्रवार-शनिवार रात्री)
* दिनांक १६- १७ मे २०२६ रोजी अप आणि डाऊन धीमा मार्ग, जलद मार्ग, ५व्या आणि ६व्या मार्गावर (शनिवार-रविवार रात्री)
दिनांक १५-१६ मे २०२६ (शुक्रवार-शनिवार रात्री) रोजी धावणाऱ्या उपनगरी गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.
दिनांक १६-१७ मे २०२६ रोजी (शनिवार- रविवार रात्री) उपनगरीय गाड्यांचे कामकाज खालील प्रमाणे चालणार आहे.
उपनगरी लोकलवर परिणाम
* सीएसएमटी, मुंबई येथून रात्री ११.३० ते १२.१२ पर्यंत सुटणाऱ्या कर्जत येथे जाणाऱ्या डाऊन धीमी लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबा घेणार नाहीत.
* कसारा येथून रात्री १०.०० वाजता सुटणारी आणि बदलापूर येथून रात्री ११.२९ वाजता सुटणारी सीएसएमटी, मुंबई येथे जाणारी अप धीमी लोकल, तसेच कर्जत येथून पहाटे ०२.३० वाजता सुटणारी आणि अंबरनाथ येथून पहाटे ०३.४३ वाजता सुटणारी लोकल, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि या लोकल नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत.
खालील गाड्या रद्द राहतील
* ठाणे-कुर्ला लोकल: ठाणे येथून रात्री ११.४० वाजता सुटणारी लोकल
* ठाणे-सीएसएटी,मुंबई : ठाणे येथून पहाटे ०४.०४ वाजता सुटणारी
* सीएसएटी,मुंबई -ठाणे : सीएसएटी,मुंबई येथून रात्री ११.३८ वाजता आणि १२ .२४ वाजता सुटणाऱ्या लोकल
खालील लोकल शॉर्ट टर्मिनेट –
* सीएसएटी, मुंबई येथून रात्री ११.०० वाजता, ११.४६ वाजता, ११.५५ वाजता आणि ११.१२ वाजता सुटणारी सीएसएटी, मुंबई -ठाणे लोकल ( वातानुकूलित उपनगरी ट्रेन ) कुर्ला स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
* डोंबिवली येथून रात्री १०.१८ वाजता सुटणारी डोंबिवली-सीएसएटी,मुंबई लोकल ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
खालील गाड्या शॉर्ट ओरीजनेट करण्यात येईल –
* विद्याविहार येथून पहाटे ०४.४५ वाजता सुटणारी कुर्ला- टिटवाळा लोकल ठाणे येथून पहाटे ०५.०९ वाजता सुटेल.
* ठाणे येथून पहाटे ०४.१६ वाजता सुटणारी ठाणे- सीएसएटी, मुंबई लोकल कुर्ला येथून पहाटे ०४.४२ वाजता सुटेल.
दिनांक १६-१७ मे २०२६ (शनिवार-रविवार रात्री) रोजी धावणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस लोकलवर कोणताही परिणाम होणार नाही.
दिनांक १७-१८ मे २०२६ (रविवार-सोमवार रात्री) रोजी धावणाऱ्या लोकलवर कोणताही परिणाम होणार नाही.