पगाराबाबत मारामारी, कोरोना संकट, आरोग्याचा धोका, 50 वयोगटातील कर्मचाऱ्यांची स्वेच्छा निवृत्तीची मागणी मान्य : अनिल परब

| Updated on: Jul 24, 2020 | 7:49 PM

एसटी महामंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय झाला (Anil Parab on ST workers Voluntary retirement) आहे.

पगाराबाबत मारामारी, कोरोना संकट, आरोग्याचा धोका, 50 वयोगटातील कर्मचाऱ्यांची स्वेच्छा निवृत्तीची मागणी मान्य : अनिल परब
Follow us on

मुंबई : “एसटी महामंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांचे वय 50 किंवा त्याहून अधिक आहे. त्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात येणार आहे. मात्र याची कोणावरही जबरदस्ती असणार नाही,” परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची घोषणा केली. (Anil Parab on ST workers Voluntary retirement)

“सध्या कोरोनाची स्थिती, आरोग्याचा धोका या बाबी लक्षात घेत काही कामगारांनी स्वेच्छा निवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती. आपण आम्हाला स्वेच्छा निवृत्ती दिली तर आमची जाण्याची तयारी आहे, असे मत अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर नुकत्यात झालेल्या एसटी महामंडळ बैठकीत स्वेच्छा निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय झाला.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“त्यानुसार ज्यांचे वय हे 50 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती दिली जाईल. त्याबाबत कुणावरही जबरदस्ती केली जाणार नाही. सध्या या वयाचे 27 हजार कर्मचारी आहेत. त्यातील कितीजण या योजनेचा फायदा घेतात, ते पाहावे लागेल. ही योजना संचालकांच्या बैठकीत मंजूर करुन घेतली आहे. त्याची अंमलबजावणी कधीपासून करायची हे ठरवण्यात येईल,” असे अनिल परब म्हणाले.

“स्वेच्छानिवृत्तीच्या या योजनेने तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला काहीसा दिलासा मिळेल. गेल्या काही दिवसांपासून पगाराबाबत मारामारी आहे. जे लोक राहतील त्यांना चांगला पगार देता येईल.”

हेही वाचा – एसटीचा मोठा निर्णय, जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित

“एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासाठी आर्थिक सहाय्य करण्याची मागणी केली. त्यांनी मला प्रस्ताव पाठवायला सांगितला आहे. तो त्यांनी मी पाठवला आहे. पगाराव्यतिरिक्तही काही गरजांबाबत प्रस्ताव पाठवला आहे. एकत्रित मदतीची मागणी केली आहे. पण पगारासाठी आवश्यक रकमेची तातडीने मदत होईल,” असे परिवहन मंत्री म्हणाले.

गणपतीसाठी एसटी सोडणार, थोडा संयम बाळगा

“गणपतीसाठी एसटी बस सोडल्या जाणार आहेत. लोकांकडून जास्त पैसे घेतले जाणार नाहीत. लोकांनी थोडा संयम बाळगावा. तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्याकडून तिकीट घेऊ नये,” असे आवाहन अनिल परब यांनी केले.

“नॉर्मल तिकीटात लोकांना गावी पाठवू. जर लोक जास्त किंमत मोजून लोक गावी गेले त्याला आम्ही जबाबदार नाही. एसटी आम्ही सोडणार आहोत. लोक गावी जातील. फक्त नियम काय असतील ते जाहीर झाल्यावर लोकांना सोडायची व्यवस्था करु. आम्ही नियम आणि अटी घालू त्यात सर्वसामान्य माणसाला काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ,” असेही अनिल परब म्हणाले.  (Anil Parab on ST workers Voluntary retirement)

संबंधित बातम्या : 

एसटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित नाही, अनिल परब यांचे स्पष्टीकरण

Konkan Ganeshotsava | चाकरमान्यांना खुशखबर, गणेशोत्सवानिमित्त कोकणात एसटीने जाण्यास सशर्त मान्यता