प्रेमात पडलेल्यांचं आवडतं गाणं तुम्हाला माहितीये का? प्रेयसीसाठी स्टेटस ठेवाल, 34 वर्षांनंतरही टॉपला
१९९२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील या गाण्याने आजच्या तरुणाईलाही वेड लावले आहे. प्रेमात पडल्यावर व्हॉट्सॲप स्टेटस आणि इन्स्टाग्राम रीलसाठी हे गाणं पसंती ठरत असून. हे गाणं ऐकून-पाहून कोणीही प्रेमात पडेल, असंच आहे.

प्रेमात पडलं की माणूस अगदी वेडा होऊन जातो. आजकालच्या जमान्यात कुणी व्हॉट्सॲपवर रोमँटिक स्टेटस ठेवतं तर कुणी दोघांचे फोटो मिक्स करून इन्स्टाग्रामवर भारी रील टाकतं. प्रेमात पडल्यावर प्रत्येक प्रियकर आणि प्रेयसी आपल्या जोडीदाराला एखादं खास गाणं डेडिकेट करतात. सध्या सोशल मीडियावरील या प्रेमाच्या ट्रेंडमध्ये ९० च्या दशकातलं एक गाणं एकदम टॉपला वाजतंय. हे गाणं ऐकलं की प्रेमाची ती नवी जाणीव थेट काळजाला भिडते.
या भन्नाट गाण्याचं नाव आहे तुम क्या मिले जाने जा. १९९२ मध्ये महेश भट्ट दिग्दर्शित सातवा आसमान हा सिनेमा आला होता. यात विवेक मुशरान आणि पूजा भट्ट यांची जोडी झळकली होती. हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला पण या गाण्याने मात्र इतिहास रचला. आज २०२६ मध्ये या गाण्याला यूट्यूबवर तब्बल १ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
गाण्याचे बोल
तुम क्या मिले जा
प्यार जिंदगी से हो गया
तुम क्या मिले जा
प्यार जिंदगी से हो गया
अजी, इज़्ज़त, अफ़ज़ाई का शुक्रिया-शुक्रिया
इस नाचीज़ को आपने क़ाबिल तो समझा
तुम क्या मिले, जान-ए-जाँ
प्यार ज़िन्दगी से हो गया
सूरज सानिम यांनी लिहिलेले हे प्रेमाचे शब्द आणि राम लक्ष्मण यांचे संगीत ऐकताना माणूस एका वेगळ्याच दुनियेत जातो. उदित नारायण आणि लतादीदींच्या आवाजाने या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. यूट्यूबवर या गाण्याला आजही लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. एका चाहत्याने आपली भावुक आठवण सांगताना लिहिले आहे की हे गाणे त्या काळातले आहे जेव्हा तो तरुण होत होता आणि आज २०२६ मध्ये हे गाणे पुन्हा ऐकताना त्याच्या डोळ्यांत पाणी आले. इंटरनेट नसलेला तो साधा सरळ आणि प्रेमाने भरलेला काळ तसेच शाळेचे ते सुंदर दिवस लोकांना या गाण्यामुळे पुन्हा आठवतात.
आणखी एका चाहत्याने आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण कमेंटमध्ये शेअर केली आहे. या गाण्याने त्याला शाळेच्या सोनेरी दिवसांची आठवण करून दिली आणि सर्व दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले असे तो म्हणतो. त्याचे पहिले आणि पवित्र प्रेम जिच्यावर होते त्या वंदनासोबत तो वॉकमनवर ऑडिओ कॅसेट लावून हे गाणे ऐकायचा. काश ते दिवस परत आले असते अशी हुरहूर त्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे हा पिक्चर फ्लॉप होऊनही त्याच्या या एका गाण्याने पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनावर राज्य केले आहे.