Maharashatra News Live : बुलढाणा : मेहकर तालुक्यात आमदार खरात यांचा जनता दरबार

Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashatra News Live : बुलढाणा : मेहकर तालुक्यात आमदार खरात यांचा जनता दरबार
| Edited By: | Updated on: Nov 01, 2025 | 8:25 AM

आज राज्यातील अनेक भागात आभाळमाया आहे. तर काही ठिकाणी पावसाने माघार घेतल्याचे दिसते. रोहित आर्याच्या एनकाऊंटरनंतर मुलांची सुटका तर विरोधकांनी शिक्षण खात्याच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उद्या 1 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीसह मनसे आणि विरोधकांचा निवडणूक आयोगावर सत्याचा मोर्चा निघणार आहे. फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा अडचणीत आल्या आहेत. एकनाथ खडसे यांच्या घरातील चोरीप्रकरणात तीन चोर अटकेत, तर मुद्देमालही जप्त करण्यात आला. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 Oct 2025 05:57 PM (IST)

    बुलढाणा : मेहकर तालुक्यात आमदार खरात यांचा जनता दरबार

     

    मेहकर तालुक्याच्या इतिहासातील प्रथमच मेहकर येथे जनतेच्या समस्येवर ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. या जनता दरबारात तालुक्यातील हजारो नागरिकांनी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होती. यावेळी अनेकांना आपल्या समस्या मांडल्या, यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या विविध समस्या दिसून आल्या.

  • 31 Oct 2025 05:42 PM (IST)

    सोलापूर: बार्शी तालुक्यातील वैराग येथे कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न

     

    बार्शी तालुक्यातील वैराग येथे दिवसाढवळ्या कोयता हातात घेऊन पोलिसांना नाव सांगितल्याचा राग मनात धरून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. आयाज अश्फाक शेख असं कोयता हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी गुंड आयाज शेख याच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 31 Oct 2025 05:30 PM (IST)

    रत्नागिरी भास्कर जाधव यांचे CM फडणवीसांना पत्र

     

    ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी, परतीच्या अवकाळी पावसामुळे भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना मराठवाडा,विदर्भाप्रमाणेच मदत जाहीर करा अशी मागणी केली आहे.

  • 31 Oct 2025 05:15 PM (IST)

    धैर्यशील माने, संजय पवार, विजय देवणे यांना बेळगावमध्ये बंदी

     

    कर्नाटक सरकारची महाराष्ट्रतील नेत्यांवरील दडपशाही सुरूच आहे. खासदार धैर्यशील माने ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना उद्या बेळगाव जिल्हा प्रवेश बंदी करण्यात आली आहे. बेळगाव मध्ये उद्या मराठी भाषिकांकडून काळा दिवस साजरा केला जाणार आहे, मात्र त्याआधी या नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे.

  • 31 Oct 2025 04:55 PM (IST)

    निलेश घायवळचा सहकारी संदीप फाटकला अटक

    गुंड निलेश घायवळचा सहकारी संदीप फाटकला पोलिसांनी अटक केली आहे. संदीप फाटकविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

  • 31 Oct 2025 04:51 PM (IST)

    रोहित आर्याने अभिनेत्री रुचिता जाधवशी साधला होता संपर्क

    रोहित आर्याने अभिनेत्री रुचिता जाधवलाही संपर्क केला होता. रुचिता जाधवने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. त्याने 4 ऑक्टोबरला कॉल केल्याचं रूचिता जाधवने सांगितलं. पवईमध्ये जी घटना घडली तीच घटना स्क्रिप्टच्या माध्यमातून मला कॉलवर सांगितली होती.

  • 31 Oct 2025 04:45 PM (IST)

    दगाफटका झाला तर फासावर जायला तयार- बच्चू कडू

    आंदोलन संपलं नाही असं बच्चू कडू यांनी सांगितली आहे. कर्जाचा पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील असंही त्यांनी सांगितलं. जर दगाफटका झालातर फासावर जायलाही तयार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

  • 31 Oct 2025 04:41 PM (IST)

    3 गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तीन जणांना अटक

    बेकायदेशीर रित्या 3 गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूस बाळगणाऱ्या 3 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना शहरासह जिल्हाभरामध्ये मागच्या काही दिवसापासून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात पोलीस ऍक्शन मोडवर असून त्या अनुषंगाने कारवाईची मोहीम देखील सुरू आहे.दरम्यान जालना जिल्हा पोलीस दलाने मागील पाच वर्षात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मानवर सर्वात जास्त कारवाया करून 39 आरोपींना अटक केले आणि त्यांच्याकडून 28 अग्निशस्त्र जप्त केले

  • 31 Oct 2025 04:31 PM (IST)

    मतदार यादीतील त्रुटी तातडीने अद्ययावत करण्याची मागणी

    ठाण्यातील नौपाडा प्रभाग क्र. 21 मधील मतदार यादीतील त्रुटी तातडीने अद्ययावत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे. प्रभाग क्रमांक 21 मधील मतदार यादीतील नोंदींची सत्यता तपासण्यासाठी कुटुंबातील मतदारांना पत्रे पाठविण्यात आली होती. मात्र, त्यापैकी मोठ्या प्रमाणात पत्रे “पत्ता अपूर्ण”, “घर सोडले”, किंवा “सदर व्यक्ती येथे राहत नाही” अशा नमूद कारणांसह परत आली आहेत.त्याचा पुरावा म्हणून डोंगरे यांनी पोस्ट पत्रे अधिकाऱ्यांच्या दालनात टाकली आणि याचा निषेध नोंदवला आहे …

  • 31 Oct 2025 04:22 PM (IST)

    उपवन परिसरात उभारली 51 फुट उंच भव्य विठ्ठलमुर्ती

    युगे अठ्ठावीस उभे विटेवरी म्हणत ठाण्यात 51 फूट भव्य विठ्ठल मूर्ती साकारण्यात आली आहे…राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मतदार संघात उपवन तलावाच्या ठिकाणी विठ्ठलाची तब्बल 51 फूट उंच भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

  • 31 Oct 2025 04:05 PM (IST)

    उमर खालिदच्या जामिनावर 3 नोव्हेंबर रोजी सुनावणी

    उमर खालिदच्या याचिकेवर आता 3 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “आम्ही 11 एप्रिल 2020 पासून पाच वर्षे आणि पाच महिने तुरुंगात आहोत. आरोपपत्रे खूप जुनी आहेत. अनेक पूरक आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. पहिले आरोपपत्र 2020 मध्ये दाखल करण्यात आले होते आणि शेवटचे पुरवणी आरोपपत्र जून 2023 मध्ये दाखल करण्यात आले होते.”

  • 31 Oct 2025 03:47 PM (IST)

    घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

    आलिशान कारने रेकी करून घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला आहे. या टोळीचा सूत्रधार शाहनवाज कुरेशीसह तिघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली असून तब्बल पंधरा लाख पन्नास हजार रुपयांचे सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे. रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दहा घरफोड्यांमागे या टोळीचा हात असल्याचं समोर आलं आहे.

  • 31 Oct 2025 03:36 PM (IST)

    पुणे – चाकणकर यांच्याविरोधात ठाकरे गट महिला आघाडीचे आंदोलन

     

    राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात शिवसेना ( ठाकरे गट) महिला आघाडीने आंदोलन केले आहे.
    रुपाली चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु आहे. फलटण येथील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याचा चाकणकर यांच्यावर आरोप आहे.

  • 31 Oct 2025 03:31 PM (IST)

    बाईसर येथे दिवसाढवळ्या फायरिंगकरुन ज्वेलर्सवर दरोड्याचा प्रयत्न

    पालघरच्या बोईसर येथे चतुर्भुज ज्वलर्समध्ये दिवसाढवळ्या फायरिंग करत दरोडा टाकण्याचा प्रकार घडला आहे. दोन अज्ञात दरोडेखोरांनी ज्वेलर्समध्ये घुसूनगावठी पिस्तुलामधून एक फायर करून काही क्षणात दुकानातील इमिटेशन ज्वलरीची बॅग घेऊन फरार झाले आहेत.दरोड्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  • 31 Oct 2025 01:35 PM (IST)

    माजी आमदार बच्चू कडू यांच्या निवस्थानाची’ उच्चस्तरीय चौकशी करा…

    भाजप आमदार प्रवीण तायडेंचा बच्चू कडू यांच्यावर आरोप… प्रवीण तायडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे 72 एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत असा आरोप तायडे यांनी केला… या हवामहालासाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्याचा गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केलाय..

  • 31 Oct 2025 01:21 PM (IST)

    बार्शी तालुक्यातील वैराग मध्ये कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड

    वैराग पोलीसांनी तत्काळ ॲक्शन घेत आरोपीला ताब्यात घेऊन गावातून काढली धिंड… वैराग येथे दिवसाढवळ्या कोयता हातात घेऊन किराणा दुकानाची तोडफोड करत दहशत माजवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता… आयाज अश्फाक शेख असं कोयता हातात घेऊन दहशत वाजवणाऱ्या युवकाचे नाव… याप्रकरणी वैराग पोलिसांनी ॲक्शन घेत आरोपीला तत्काळ अटक केली…. सुरज भोसले यांच्या किराणा दुकानात घेऊन जात आरोपी शेख याची दहशत कमी करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला… आयाज शेख यांनी दुकानदाराला शिवीगाळ करत ‘तुला आता जिवंत सोडत नाही, तुला बघतोच. तू मागच्या केस मध्ये आमचं नाव पोलिसांना का सांगितलं’ म्हणून धमकावलं होतं… या प्रकरणी आयाज शेख याच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • 31 Oct 2025 01:01 PM (IST)

    अमरावती- सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या नोंदणीला आजपासून सुरुवात

    अमरावती- सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव, खंडेश्वर खरेदी- विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी झुंबड उडाली आहे. सोयाबीनच्या शासकीय नाफेडच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. काल रात्रीपासूनच शेतकरी रांगेत उभे आहेत.

  • 31 Oct 2025 12:54 PM (IST)

    जालन्यात ब्लॅक फिल्म वापरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई

    जालन्यात ब्लॅक फिल्म वापरणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखा आणि जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांची संयुक्त कारवाई करण्यात आली. 162 वाहनांवर कारवाई करून एक लाख 37 हजार रुपयांचा दंडही वसूल केला. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतर वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. यापुढे वाहनांच्या काचा पूर्णपणे पारदर्शक ठेवण्याच्याही पोलिसांच्या सूचना आहेत.

  • 31 Oct 2025 12:37 PM (IST)

    जे. जे. रुग्णालयात रोहित आर्याचं शवविच्छेदन

    रोहित आर्याचं शवविच्छेदन जे. जे. रुग्णालयात काही वेळात होणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत हे शवविच्छेदन होणार आहे. शवागृहासमोर पोलीस बंदोबस्त असून रुग्णालय कर्मचारी तिथे पोहोचले आहेत. रोहित आर्याने पवईतील स्टुडिओत 17 अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवलं होतं.

  • 31 Oct 2025 12:28 PM (IST)

    कडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

    बीड- आष्टी मतदारसंघातील कडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. साखर आयुक्तांच्या आदेशाने कडा साखर कारखान्याचा परवाना रद्द करण्यात आला. त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन केलं जात आहे.

  • 31 Oct 2025 12:18 PM (IST)

    उद्या होणाऱ्या मोर्चावर वर्षा गायकवाड यांचं अस्पष्ट उत्तर

    वर्षा गायकवाड यांनी उद्या होणाऱ्या मोर्चावर अस्पष्ट उत्तर दिलं. वर्षा गायकवाड उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होतील की नाही हे देखील सांगण्यात आलं नाही. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “उद्याच्या मोर्चाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील.”

  • 31 Oct 2025 12:07 PM (IST)

    आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडून विधानसभेतील मतदान प्रक्रियेबाबत गंभीर शंका उपस्थित

    खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेबाबत गंभीर शंका उपस्थित केली. मतदान किती झालं यापेक्षा झालेल्या मतदानात फरक किती होता असा थेट सवाल त्यांनी केला.खेड तालुक्यात सुमारे 50 ठिकाणी बुथच लागले नाहीत, तरीही उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान झालं. आम्ही मुबईतून मतदारांना आणूनही अनेक गावांमध्ये मतदानातील तफावत दिसली, असं ते म्हणाले.

  • 31 Oct 2025 11:53 AM (IST)

    रोहित आर्याच्या कुटुंबियांशी पोलिसांकडून संपर्क करण्याचा प्रयत्न

    के एस पाटील पोलिस सर्जन, नागपाडा पोलिस रुग्णालयचे डॉक्टर जेजे रुग्णालयात दाखल. शवविच्छेदन करण्यापूर्वी मृत रोहित आर्याच्या कुटुंबियांशी पोलिसांकडून संपर्क करण्याचा प्रयत्न. शवविच्छेदना दरम्यान कुटुंबियांची उपस्थिती महत्वाची असल्याने होत आहे विलंब.

  • 31 Oct 2025 11:42 AM (IST)

    शेतकरी खूप अडचणीत आहे – दत्तात्रय भरणे

    “शेतकरी खूप अडचणीत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळामधील सर्वच मदत करीत आहेत. मी स्वतःला नशीबवान समजतो, छत्रपती कारखाना संचालक झाल्यानंतर चांगल्या वाईट गोष्टी मला शिकवल्या आहेत. कारखान्याने आम्हाला घडवलं असल्याने आम्हाला जाण आहे” असं राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

  • 31 Oct 2025 11:20 AM (IST)

    तुम्ही एकत्र या आम्हाला काही देणे घेणे नाही, संजय शिरसाटांची राज ठाकरेंवर टीका

    “राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, त्यामुळे अजून पुन्हा एक कन्फ्युज नेत्याच्या यादीत आले आहेत.
    तुम्ही का सोडले त्यांना? बडव्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना घेरले असे म्हणाले होता. त्यांनी साम्राज्य स्थापन केले असे म्हणाले होते आणि आता रोज तिथे जाता. तुम्ही एकत्र या आम्हाला काही देणे घेणे नाही” अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

  • 31 Oct 2025 11:10 AM (IST)

    फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाची अपडेट

    निलंबित फौजदार गोपाल बदने यांची कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी सुरु. वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती. गोपाल बदने हा फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी. याआधी फौजदार बदने याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का? याबरोबरच पोलीस दलात काम करत असताना कामामध्ये कुसर ठेवली आहे का? अशा अनुषंगाने पोलीस कोठडीत चौकशी केली जात आहे.

  • 31 Oct 2025 11:03 AM (IST)

    रोहित आर्याचा मृतदेह जेजे रुग्णालयात आणला, थोड्याच वेळात होणार पोस्ट मार्टम

    रोहित आर्याचा मृतदेह जेजे रुग्णालयात आणला

    थोड्यावेळात शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरची टीम येणार असल्याची माहिती

    तज्ज्ञ  डाॅक्टरांचे पथक करणार रोहित आर्याचं पोस्ट मार्टम

    तीन तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या सहाय्यकांचा या पथकात समावेश

     

     

  • 31 Oct 2025 10:35 AM (IST)

    घरगुती वादातून भाच्यानेच केली मामाची हत्या, कल्याण हादरलं

    कल्याण मोहनी परिसरात धक्कादायक घटना

    घरगुती वादातून भाच्यानेच केली मामाची हत्या

    मामाचं डोकं रुग्णालयाच्या पायऱ्यांवर आपटून केली हत्या

    मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

    गणेश रमेश पुजारी असं आरोपी भाच्याचं नाव

    तर मारिअप्पा राजू नायर वय 40 असं मृत मामाचं नाव

     

  • 31 Oct 2025 10:28 AM (IST)

    धाराशिवमध्ये माजी नगरसेवकाला मारहाण

    धाराशिवमध्ये माजी नगरसेवकाला मारहाण

    माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांना मारहाण

    विजय राठोड आणि माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यामध्ये वाद

    मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद, पोलिसांचा तपास सुरू

  • 31 Oct 2025 10:07 AM (IST)

    हिंगोलीमध्ये पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका, कापसाचं प्रचंड नुकसान

    हिंगोलीमध्ये पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका

    कापसाचं प्रचंड नुकसान

    कापूस भिजून काळा झाला, मजूर मिळेना

    शेतकरी हवालदिल,  मोठं नुकसान

     

     

  • 31 Oct 2025 09:55 AM (IST)

    सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या नोंदणीला आजपासून होणार सुरुवात

    अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर खरेदी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी झुंबड.. सोयाबीनच्या शासकीय नाफेडच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या लागल्या रांगा, काल रात्रीपासूनच शेतकरी रांगेत उभे.. सोयाबीनचा शासकीय दर हा प्रति क्विंटल 5 हजार तीनशे 28 रुपये दर असून सध्या खाजगी बाजारात मात्र शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 3200 ते 4000 रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची शासकीय खरेदी कडे धाव……

  • 31 Oct 2025 09:40 AM (IST)

    एसटी महामंडळाला दिवाळीत लक्ष्मी पावली

    दिवाळीत एसटी महामंडळाला लक्ष्मी पावली आहे, प्रवासी वाहतुकीतुन गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीड कोटींनी एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. यावर्षी 18 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या दिवाळीच्या 10 दिवसात एसटी महामंडळाला राज्यभरात दररोज सरासरी 30 कोटी याप्रमाणे तब्बल 301 कोटी उत्पन्न मिळाले आहे.

  • 31 Oct 2025 09:30 AM (IST)

    महिलेला बेदम मारहाण

    बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मानुर येथील 44 वर्षीय सुलोचनाबाई कदम यांना भावकीतील नागेश कदम याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादाच्या दरम्यान आरोपी नागेश कदम आणि दिपक नागेश कदम यांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने आणि लोखंडी गजाने सुलोचनाबाई कदम यांच्यासह त्यांच्या पतीला आणि मुलाला मारहाण केली.

  • 31 Oct 2025 09:20 AM (IST)

    बार्शी तालुक्यातील वैराग येथे कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न

    वैराग येथे दिवसाढवळ्या कोयता हातात घेऊन पोलिसांना नाव सांगितल्याचा राग मनात धरून हातात कोयता घेऊन धमकवल्याचा प्रकार समोर. आयाज अश्फाक शेख असं कोयता हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या युवकाचे नावसदर दुकानदाराच्या दुकानात आयाज शेख याच्यासह चार साथीदारांनी एक जणाला मारहाण केली होती.

     

  • 31 Oct 2025 09:10 AM (IST)

    जून ते सप्टेंबर पर्यंत अमरावती जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 570 कोटीची मिळणार मदत

    रब्बीच्या बी बियाण्यासाठी 547 कोटी रुपयांची विशेष मदत जाहीर. अमरावती जिल्ह्यासाठी 4.91लाख शेतकऱ्यांसाठी दोन्ही मिळून एक हजार 117 कोटी रुपयांची सरकारकडून मदत. जून ते सप्टेंबर दरम्यान अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.

  • 31 Oct 2025 09:04 AM (IST)

    इतरांच्या बंधनातून मुक्त झालो- गोगावले

    सुनील तटकरे यांच्या वक्तव्यावर मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 59 जागांवर महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी हा फॉर्म्युला सर्वांसमोर ठेवला होता. मात्र या फॉर्मुलाची खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खालापूर येथील एका कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांची खिल्ली उडविली होती. त्याला उत्तर देत गोगावले यांनी म्हटले की, इतरांच्या बंधनातून मुक्त झालो.

  • 31 Oct 2025 08:58 AM (IST)

    चाळीसगावात ‘रन फॉर युनिटी’ कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन धावले

    सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त चाळीसगावात ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले होते. महाराणा प्रताप चौक ते अहिल्यादेवी होळकर उड्डाणपुलापर्यंत ‘रन फॉर युनिटी’चे अंतर्गत धावण्याची स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवत स्वतः सहभाग नोंदवला

  • 31 Oct 2025 08:50 AM (IST)

    समृद्धी महामार्ग रास्ता रोको,तीनशे ते चारशे आंदोलकांवर गुन्हे दाखल

    बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्या या प्रमुख मागणीसाठी वाशिम च्या मालेगाव जवळ समृद्धी महामार्गावर बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आल. यावेळी आंदोलकांनी पोलिसांचे आदेश न मानता बेकायदेशीर जमाव जमवून वेगवेगळ्या ठिकाणावरून समृद्धी महामार्गावर अनेक कार्यकर्ते चढून उड्डाणपुलाचे खाली जमा होऊन समृद्धी महामार्गावर नागपूर ते मुंबईकडे जाणारे आणि मुंबई ते नागपूरकडे जाणारे असे दोन्ही लेन वरील रोडवर बसले. त्यामुळे वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. त्यामुळं सहा आंदोलकांवर व इतर तीनशे ते चारशे लोकांवर सुद्धा मालेगाव पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • 31 Oct 2025 08:40 AM (IST)

    सोलापुरमध्ये राष्ट्रवादीतील धुसफुस समोर

    राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांचा अजब कारभार पाहायला मिळाला. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबईतील बैठकीला शहराध्यक्षांनी प्रतिनिधी म्हणून भाजप कार्यकर्त्याला पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवारांच्या एका गटाकडून आक्षेप घेण्यात आला.आगामी महापालिका निवडणुकीचा अनुषंगाने शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती

  • 31 Oct 2025 08:30 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर वासीयांना नवीन वर्षात एक जानेवारी पासून मिळणार दररोज पाणी

    2026 या नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांना अतिरिक्त 200 एम.एल.डी. पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. 15 डिसेंबर पासून जायकवाडीहून पाण्याचा उपसा करणे आणि नक्षत्रवाडी येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्रात टेस्टिंग केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 डिसेंबर पर्यंत शहराला अतिरिक्त पाणी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांना नवीन वर्ष एक जानेवारी 2026 पासून दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे..

  • 31 Oct 2025 08:26 AM (IST)

    धाराशिवमधील 90 हजार शेतकऱ्यांना अनुदान

    सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी मध्ये जिल्ह्यातील चार लाख शेतकरी बाधित, फक्त 90 हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळाले. जिल्ह्यात आणखी लाखो शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीसाठी 223 कोटीचे अनुदान झाले प्राप्त झाल्याची जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारा यांनी माहिती दिली. जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या दोन लाख 30 हजार शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार

  • 31 Oct 2025 08:16 AM (IST)

    आरक्षण प्रश्नावर मातंग समाज आक्रमक

    आरक्षण प्रश्नावर मातंग समाज आक्रमक झाला आहे. लहुजी शक्ती सेनेकडून मुंबई ते नागपूर 1260 किलोमीटर पदयात्रेच आयोजन करण्यात आले आहे.राज्यभरातून मातंग समाज बांधव एकत्र येत नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर धडकणार आहे.
    महाराष्ट्रातील 15 जिल्हे आणि 1260 किलोमीटरच अंतरपार करत मोर्चा नागपूर अधिवेशनावर धडकणार आहे. अहिल्यानगरच्या सोनाई येथील मातंग समाजाच्या तरुणाला झालेल्या मारहाणी बाबत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच मातंग समाजाच्या आरक्षणासाठी अ ब क ड असे वर्गीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे दोन नोव्हेंबर पासून चेंबूर येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून होणार पदयात्रेला सुरुवात, धाराशिव येथून पदयात्रीची जोरदार तयारी करण्यात आली आहे.