Maharashatra News Live : अशोक चव्हाणांनी टोचले भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे कान

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashatra News Live : अशोक चव्हाणांनी टोचले भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे कान
| Edited By: | Updated on: Sep 20, 2025 | 8:42 AM

आज राज्यात आभाळमाया आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यात पावसाने सर्वाधिक कहर केला आहे. मुख्य मुंबईत वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. तर दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी उद्धव ठाकरे सेनेची महत्त्वाची बैठक आहे. अंबरनाथमध्ये दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केल्याचे दिसून आले. मराठा आरक्षणाबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षण जीआरविरोधातील याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Sep 2025 06:53 PM (IST)

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या बिहारच्या दौऱ्यावर

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, 20 सप्टेंबर रोजी बिहारमधील गया येथे भेट देणार आहेत. तिथे त्या श्री विष्णुपाद मंदिरात प्रार्थना करतील.

  • 19 Sep 2025 06:49 PM (IST)

    अशोक चव्हाणांनी टोचले भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे कान

    भाजपा खासदार अशोक चव्हाणांनी गोपीचंद पडळकरांचे कान टोचले.  टीका करण्याचा सर्वांना अधिकार मात्र वैयक्तिक पातळीवर टीका करणे अतिशय अशोभानीय असं त्यांनी सांगितलं.  लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असला तरी इतरांना ही भावना आहेत. त्यांच्या भावना लक्षात ठेऊन आपण पातळी न सोडता आपली भूमिका योग्यरीतीने मंडली पाहिजे.  यामध्ये त्यांनी माफी मागण्याने किंवा न मागण्याने काही फरक पडत नाही. या गोष्टीला मी महत्व देत नाही.  माणसाचं मन दुखावण्याचं काम, व्यक्तिगत शांती हनन करण्याचं काम करू नये, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

  • 19 Sep 2025 06:33 PM (IST)

    आमदार विलास तरे आक्रमक, महामार्गावरील ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

    मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीत दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्यानंतर बोईसरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विलास तरे यांनी महामार्गावरील ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. महामार्गावर झालेले निकृष्ट दर्जाचे काम याला जबाबदार असून, मी स्वतः या महामार्गावरील वाहतूक कोंडीसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. आता स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्राकडे पुन्हा या रस्त्याच्या दूरवस्थेबाबत तक्रार करणार आहे. डहाणू ते दहिसर टोल नाक्यापर्यंत आतार्यंत 200 जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा खुलासा ही तरे यांनी केला आहे.

  • 19 Sep 2025 06:18 PM (IST)

    सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी कॉफी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला

    काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वढेरा यांनी कालपेट्टा येथील चुंडाळे येथील प्रादेशिक कॉफी संशोधन केंद्रात कॉफी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

  • 19 Sep 2025 06:07 PM (IST)

    शेतकऱ्यांना मदत द्यावी ही सरकारला विनंती- मकरंद अनासपुरे

    शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी ही सरकारला विनंती असे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी म्हटले आहे.

  • 19 Sep 2025 06:03 PM (IST)

    उत्तर प्रदेशात 30 सप्टेंबरपासून एसआयआर प्रक्रिया सुरू होईल

    उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एसआयआर प्रक्रिया सुरू होईल. पदवीधर शिक्षकांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादी पुनरावृत्ती प्रक्रिया 30 सप्टेंबर रोजी सुरू होईल. पदवीधर मतदारसंघांमध्ये लखनऊ, आग्रा, मेरठ, अलाहाबाद-झांसी आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये लखनऊ, आग्रा, मेरठ, बरेली-मुरादाबाद आणि गोरखपूर-फैजाबाद यांचा समावेश आहे.

  • 19 Sep 2025 05:45 PM (IST)

    पोलीसांनी काढली खुनाच्या आरोपातील आरोपींची धिंड

    नंदुरबार पोलीसांनी खुनाच्या आरोपातील आरोपींची धिंड काढली आहे. मंगळवारी रात्री आपसी वादातून जय वळवी युवकाचा चाकूने भोकसून खुन झाला होता. नंतर झालेल्या तीन घटनांमध्ये पोलीसांनी तब्बल पाच आरोपींना अटक केली. पाच पैकी चौघांची पोलीसांनी आरोपींच्या घरापासून ते पोलीस स्टेशनपर्यत धिंड काढली

  • 19 Sep 2025 05:30 PM (IST)

    सोलापूर-मुंबई, सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरु

    सोलापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर पूर्ण होणार. बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून होणार सुरु. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती.

  • 19 Sep 2025 05:15 PM (IST)

    राष्ट्रीय महामार्गावर अचानक कारने घेतला पेट

    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात राष्ट्रीय महामार्गावर अचानक कारने पेट घेतला आहे. शहरातील आनंदवन चौकात ही घटना घडली. आगीचे कारण मात्र अज्ञात, थोड्या वेळासाठी या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

  • 19 Sep 2025 04:58 PM (IST)

    जोपर्यंत GR रद्द केला जाणार नाही तोपर्यंत ओबीसीचा एल्गार मोर्चा सुरु राहणार – लक्ष्मण हाके

    ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आंदोलनाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. जोपर्यंत मराठी आरक्षणाचा जीआर रद्द केला जाणार नाही तोपर्यंत ओबीसीचा एल्गार मोर्चा महाराष्ट्रामध्ये सुरूच राहील असं हाके यांनी म्हटलं आहे. राज्यात 100 सभा घेतल्यानंतर आम्ही मुंबईत सभा घेण्याचं जाहीर करू असंही हाके म्हणाले आहेत.

  • 19 Sep 2025 04:45 PM (IST)

    मतदार याद्यांचा अभ्यास करा, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश

    निवडणुकीत गाफील राहू नका, मतदार आपल्याला मतदान करतात, मात्र ही मतं चोरीला जातात. त्यामुळे मतदार याद्यांचा अभ्यास करा, प्रत्येक यादीवर 2 बीएलओ नेमा आणि गटअध्यक्षांना याद्यांची जबाबदारी वाटून द्या, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथमध्ये पदाधिकारी मेळाव्यात दिले. यावेळी अंबरनाथ शहराची नवी कार्यकारिणीही राज ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली.

  • 19 Sep 2025 04:30 PM (IST)

    जळगाव: पाचोरा तालुक्यात महिलेसह 15 वर्षीय मुलगी गेली वाहून

    जळगावच्या पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक गावात हिवरा नदीच्या पुराच्या पाण्यात महिलेसह 15 वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने महिलेला वाचवण्यात यश आले असून महिला सुखरूप आहे. मात्र 15 वर्षीय मुलगी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेली. निकिता भालेराव असे नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलीचे नाव असून सरला खरे असं 35 वर्षीय सुखरूप असलेल्या महिलेचे नाव आहे.

  • 19 Sep 2025 04:15 PM (IST)

    गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर यशोमती ठाकूर संतापल्या

    भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर बोलताना माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘जयंत पाटील यांच्याविरुद्ध वापरलेली अर्वाच्य, घाणेरडी आणि अमानुष भाषा ही फक्त एका व्यक्तीचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आणि मातृशक्तीचा अवमान आहे. पडळकरांसारख्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे आपल्या पवित्र परंपरेवर डाग लागतो आहे असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

  • 19 Sep 2025 03:59 PM (IST)

    सांगोला तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    सांगोला तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. जवळपास 70 ते 80 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाची माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी पाहणी केली.

    सांगोला तालुक्यातील अकोला,वासूद,कडलास निजामपूर, भागातील शेतकऱ्यांनी माजी आमदार शहाजी बापू पाटलांसमोर टाहो फोडला. सरकारने लवकरात लवकर मदत करण्याची नुकसानग्रस्तांनी मागणी केली. तर शेतकऱ्यांसाठी आणि नुकसानग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.

  • 19 Sep 2025 03:55 PM (IST)

    पुणे विद्यापीठाचा परीक्षा शुल्कात 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिवाळी सत्र 2025 पासून परीक्षा शुल्कात तब्बल 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात(NSUI) नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया संघटनेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा भवनासमोर आंदोलन केलंय. हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आणि अवास्तव असल्याचं विद्यार्थी संघटनेचं म्हणणं आहे. तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकाची आंदोलनकर्त्यांकडून होळी केली जाणार आहे.

  • 19 Sep 2025 03:34 PM (IST)

    नाशिकच्या देवळाली परिसरात दुचाकीने घेतला पेट

    नाशिकच्या देवळाली परिसरात दुचाकीने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बाईकने अचानक पेट घेतला. मात्र सतर्क नागरिकांनी बाईकला लागलेली आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र आगीचे कारण समजू शकलं नाही.

  • 19 Sep 2025 03:22 PM (IST)

    धाराशिवच्या भूममध्ये मुसळधार पावसात पाझर तलाव फुटला

    धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्याच्या साबळेवाडी येथील लघु पाटबंधारे विभागाचा पाझर तलाव फुटला. तलाव फुटल्याने परिसरातील शेकडो हेक्टर शेती वाहून गेली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. शेतातील विहिरी तलावातील मलब्यामुळे बुजून गेल्या आहेत. तलाव लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्ष असल्याने फुटल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केलाय.

  • 19 Sep 2025 03:06 PM (IST)

    नाशिकमधील चांदवड तालुक्यात दमदार पावसाची हजेरी

    नाशिकमधील चांदवड तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वाळकेवाडी, वाहेगाव, दहिवड, दिघवदसह बहुतांश गावांमध्ये मुसळधार सरी बरसल्या आहेत. पावसामुळे रेणुका देवी मंदिराजवळ धबधबे प्रवाहीत झाले आहेत. परिसर निसर्गरम्य झाला आहेत.

  • 19 Sep 2025 02:57 PM (IST)

    प्रवीण तोगडिया यांनी आळंदी घेतले माऊलींच्या समाधीचे दर्शन

    विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी आज आळंदीमध्ये माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतलं आहे.यंदा माऊलींच सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने आज त्यांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.

  • 19 Sep 2025 02:47 PM (IST)

    जालन्यात धनगर समाजाच्या उपोषणाला वंजारी समाजाचा पाठींबा

    जालन्यात धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला सकल वंजारी समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे. धनगरांचा एसटी आरक्षणात समावेश करावा अशी मागणी करत दीपक बोराडे यांनी तीन दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. दीपक बोराडे यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत,अशी प्रतिक्रीया वंजारी समाज बांधवांनी दिली आहे.

  • 19 Sep 2025 02:37 PM (IST)

    बीड -गोपीचंद पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

    भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला निषेध.गोपीचंद पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन केला निषेध व्यक्त आहे.

  • 19 Sep 2025 02:16 PM (IST)

    पुण्यात गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ फलकबाजी

    भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील त्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड परिसरात ठीक ठिकाणी फलक लावले निषेध केला आहे.

  • 19 Sep 2025 02:07 PM (IST)

    घोडसगाव पुलावर पडले मोठे भगदाड

    खानदेश आणि विदर्भाला जोडणाऱ्या घोडसगाव पुलाची दुरवस्था झाली आहे. येथे पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.

  • 19 Sep 2025 01:55 PM (IST)

    ओबीसी हक्क आणि अधिकार बचाव मोर्चाला सुरुवात

    धारूर चौकातून ओबीसी हक्क आणि अधिकार बचाव मोर्चाला सुरुवात झाली आहे‌. या मोर्चासाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे उपस्थित झाले आहेत. आजच्या या मोर्चानंतर लक्ष्मण हाके हे ओबीसी बांधवांना संबोधित करणार आहेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष.

  • 19 Sep 2025 01:45 PM (IST)

    राज ठाकरे यांची कल्याण मधील पदाधिकाऱ्यांना सूचना

    राज ठाकरे यांची कल्याण मधील पदाधिकाऱ्यांना सूचना. मतदान यादी संदर्भात सतर्क रहा .एका मतदान यादीवर दोन प्रतिनिधी देत मतदान यादीवर काम करा. मतदान यादीवर काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देखील देण्यात येणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली

  • 19 Sep 2025 01:23 PM (IST)

    पडळकरांच्या स्टेटमेंटला समर्थन नाही – देवेंद्र फडणवीस

    “जयंत पाटील यांच्यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांनी जे स्टेटमेंट केलं, त्या बद्दल मी त्यांच्याशी बोललो. पडखळकरांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात शरद पवारांचा फोन आला. पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं, ते योग्य आहे, असं माझ मत नाही. आपण जबाबदारीने बोललं पाहिजे, असा पडळकराना सल्ला दिला” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

     

  • 19 Sep 2025 01:17 PM (IST)

    महाराष्ट्र स्टील मेकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असेल – देवेंद्र फडणवीस

    “महाराष्ट्र स्टील मेकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असेल. आमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राची मदत घेऊ. ग्रीन स्टील कसं तयार करता येईल ही थीम. गडचिरोली नवं स्टील हब म्हणून विकसित होतय. ग्रीन स्टीलसाठी 5 हजार कोटींचा निधी. मुंबईत स्टील महाकुंभ संपन्न झाला” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

     

  • 19 Sep 2025 01:11 PM (IST)

    महापालिका प्रशासनाने बजावली 5 ठेकेदारांना नोटीस

    नाशिक शहरातील खड्ड्यांबाबत महापालिका प्रशासन आक्रमक. मात्र इतर ठेकेदारांवर कारवाई का नाही ? मनसेचा सवाल. मनसे आणि ठाकरे शिवसेनेच्या मोर्चा नंतर महापालिकेला जाग आल्याचा दावा. गिरीश महाजन यांनी मोर्चाचा धसका घेतला. मनसे नेते दिनकर पाटील यांचा गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप. गिरीश महाजन यांच्यावर माझा विश्वास नाही असं दिनकर पाटील म्हणाले.

  • 19 Sep 2025 01:01 PM (IST)

    ठाकरे बंधूंच्या युतीत मी का नाक खुपसू ? अजित पवार

    ठाकरे बंधूंच्या युतीत मी का नाक खुपसू ? कोणी कुठे एकत्र यावं , हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे – अजित पवार

  • 19 Sep 2025 12:36 PM (IST)

    सांगली – . सांगलीच्या संस्कृती, परंपरेला अशी वक्तव्ये शोभणारी नाहीत – विशाल पाटील

    सांगली – सांगलीच्या संस्कृती, परंपरेला अशी वक्तव्ये शोभणारी नाहीत. जिल्ह्यात काही लोकांकडून जी वक्तव्य होत आहेत त्याच्या मागे कोण आहे, बोलणाऱ्या व्यक्तीला फूस, मोकळीक कोणी दिले आहे हे पाहायला पाहिजे असं विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या विरोधात विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 19 Sep 2025 12:29 PM (IST)

    परभणी जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसानपोटी मिळालेली मदत तुटपुंजी असल्याचे म्हणत  स्वाभिमानी आक्रमक

    परभणी जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसानपोटी 128 कोटी मिळाले, मिळालेली मदत तुटपुंजी असल्याचे म्हणत  स्वाभिमानी आक्रमक, स्वाभिमानी कडून परभणी वसमत महामार्ग अडवण्यात आले.

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून परभणीत जोरदार आंदोलन सुरू आहे.  अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असताना केवळ 128 कोटीची मदत मान्य नसल्याचा स्वाभिमानीचा पवित्रा, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

  • 19 Sep 2025 12:13 PM (IST)

    मुंबई हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी

    दिल्ली हायकोर्टानंतर आता पुन्हा एकदा बॉम्बे हायकोर्टला बाॅम्बने ऊडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. उच्च न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर या परिसरात बाँब ठेवल्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.  धमकीची शहानिशा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून उच्च न्यायालय आणि परिसराची तपासणी सुरू झाली आहे.

    धमकीच्या या ई-मेलनंतर तत्काळ कोर्टातील सर्वांना बाहेर काढण्यात आले. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा काही क्षणांतच सतर्क झाल्या व घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम हाती घेतली.

  • 19 Sep 2025 11:54 AM (IST)

    गोरेगावात स्टील महाकुंभाचे आयोजन, ६० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा करार

    गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये विविध कंपन्यांकडून स्टील महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. देशासह जगभरातील स्टील उद्योजकांना आकृष्ट करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न आहे. स्टील उद्योगांच्या संदर्भात राज्य सरकार आणि कंपन्यांमध्ये ६० हजार कोटींची गुंतवणूक करार करण्यात आला आहे. गुंतवणुकीतून ४० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

  • 19 Sep 2025 11:35 AM (IST)

    बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा, पडळकरांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांचा फडणवीसांना फोन

    गोपीचंद पडळकरांच्या टीकेनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला आहे. यावेळी शरद पवारांनी बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा, अशी सूचना देवेंद्र फडणवीसांना दिली आहे. अशाप्रकारे गलिच्छ टीका करणे योग्य नव्हे, असे शरद पवार म्हणाले.

  • 19 Sep 2025 11:21 AM (IST)

    भाम धरण ते मांजरगाव दरम्यानच्या रस्त्याची पुन्हा दुरवस्था, कोट्यावधी रुपयांचा चुराडा

    मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील ग्रामसडक योजनेअंतर्गत दुर्गम भागांतील गावांना शहरांशी जोडण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी या कामांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे उघड झाले आहे. इगतपुरी तालुक्यातील भाम धरण ते मांजरगाव दरम्यानच्या सुमारे तीन कोटी रुपये खर्चाच्या पाच किलोमीटर रस्त्याची अवघ्या सहा महिन्यांत दुरवस्था झाली आहे. हा रस्ता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पूर्णपणे खराब झाला असून, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमताने सर्वसामान्य लोकांच्या पैशांचा चुराडा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची आणि रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, मोठे आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

  • 19 Sep 2025 11:08 AM (IST)

    राज ठाकरेंच्या दौऱ्याआधी अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अंबरनाथ दौऱ्याच्या आधीच अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. शहरातील शिवाजी चौक, स्टेशन परिसर आणि इतर मुख्य भागांत अनधिकृत टपऱ्या आणि फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. मात्र, अनेक दिवसांपासून या अनधिकृत बांधकामांवर कोणतीही कारवाई होत नव्हती. राज ठाकरे यांच्या दौऱ्याची घोषणा होताच अतिक्रमण विभागाला जाग आल्याचे दिसून आले. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये आणि फेरीवाल्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

  • 19 Sep 2025 10:55 AM (IST)

    अंबरनाथमध्ये ठाकरे आणि मनसेची बॅनरबाजी!

    अंबरनाथमधील हुतात्मा चौकात राज ठाकरे दौऱ्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याचे एकत्र बॅनर… महाराष्ट्रात फक्त ठाकरेच .. अशा आशियाची लागले बॅनर… बॅनर वर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावून शक्तिप्रदर्शन… चर्चेला उधाण!”

  • 19 Sep 2025 10:52 AM (IST)

    समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ओळख – अजित पवार

    राष्ट्रवादीची भूमिका विचारधारा काय यासाठी चिंतन शिबिर… चिंतन शिबिर पुढच्या पिढीसाठी आहे… नेते फक्त निवडणुकीवेळी दिसतात असं जनतेला वाटू द्यायचं नाही… असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे

  • 19 Sep 2025 10:45 AM (IST)

    जिल्हा परिषद शाळेतील 4 शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थी ढसाढसा रडले

    सोलापूरच्या नान्नज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 4 शिक्षकांची बदली झाली. आपल्या शाळेतील शिक्षकांची बदली झाल्याचे कळताच शाळेतील विद्यार्थ्यांनी टाहो फोडला. शिक्षिका कांचन घोडके, फुलन साठे, दत्तात्रय माने, अर्चना क्षीरसागर या चार शिक्षकांच्या दुसऱ्या गावातील शाळेत बदली आहे. शाळेत निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी निरोप समारंभातच विद्यार्थ्यांनी टाहो फोडल्याचे पाहायला मिळाले

  • 19 Sep 2025 10:30 AM (IST)

    नाशिक मध्ये दसरा मेळाव्याच्या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो

    दसरा मेळावा एकत्रित घ्यावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा… दोन्ही नेत्यांकडून अद्यापही अधिकृत भूमिका जाहीर नसली… तरी नाशिकमध्ये मात्र दसरा मेळाव्याच्या बॅनरवर दोन्ही भावांचे फोटो… मुंबईच्या शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा एकत्रित होणार का याबाबत संभ्रम… मनसे शिवसेना अद्याप युतीची घोषणा नसताना शहरात मात्र झळकले बॅनर

  • 19 Sep 2025 10:12 AM (IST)

    आनंद दिघेंनी कधीच शिवसेनेचा व्यापार केला नाही – संजय राऊत

    आनंद दिघेंनी कधी शिवसेनेचा व्यापार केला नाही… जे विरोध करतात ते टेंभी नाक्यावरचे टपोरी आहेत.. दिघेंनी पदासाठी कधीच मागणी केली नाही… ठाणे शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरे यांचं… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 19 Sep 2025 09:55 AM (IST)

    जिल्हा परिषद शाळेतील 4 शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थी ढसाढसा रडले

    सोलापूरच्या नान्नज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 4 शिक्षकांची बदली झाली. आपल्या शाळेतील शिक्षकांची बदली झाल्याचे कळताच शाळेतील विद्यार्थ्यांनी टाहो फोडला. शिक्षिका कांचन घोडके, फुलन साठे, दत्तात्रय माने, अर्चना क्षीरसागर या चार शिक्षकांच्या दुसऱ्या गावातील शाळेत बदली आहे.

  • 19 Sep 2025 09:40 AM (IST)

    कल्याण-अंबरनाथ दौऱ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे

    दोऱ्या दरम्यान दोन्ही शहरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन घेणार संघटनाचा आढावा. अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी – सभागृह सज्ज!.. पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी अपेक्षित.

     

  • 19 Sep 2025 09:25 AM (IST)

    प्रशिल मानकर याचा मिळाला मृतदेह

    आज सकाळच्या दरम्यान शोध कार्य सुरू असताना गावापासून अवघ्या शंभर मीटरवर झुडपात आढळून आला मृतदेह,पोस्टमार्टम साठी न नेता गावकऱ्यांनी गावात आणला मृतदेह. हल्ला करणाऱ्या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची आणि गावात पुन्हा हिंस्र पशूंचे हल्ले होणार नाही यासाठी

  • 19 Sep 2025 09:10 AM (IST)

    नाशिकमध्ये दसरा मेळाव्याच्या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो

    दसरा मेळावा एकत्रित घ्यावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा. दोन्ही नेत्यांकडून अद्यापही अधिकृत भूमिका जाहीर नसली. तरी नाशिकमध्ये मात्र दसरा मेळाव्याच्या बॅनरवर दोन्ही भावांचे फोटो

     

  • 19 Sep 2025 09:00 AM (IST)

    शासकीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे जयत्त तयारी

    22 सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव सुरू होत आहे त्याच पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तुळजापूर नगरपालिका प्रशासन जोरदार तयारीला लागले आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा उभारल्या जात आहेत शहरातील घाटशीळ पार्किंग येथे जवळजवळ 15 ते 20 हजार भाविक बसतील अशा प्रकारचा वॉटरप्रूफ मंडप नगरपालिका प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आला आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी शहरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही आणि पोलीस चौकी भरण्यात आल्या आहेत महत्त्वाचे म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच AI चा वापर करत मंदिरात आणि शहरात ठीक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत

  • 19 Sep 2025 08:50 AM (IST)

    अंबरनाथमध्ये ठाकरे आणि मनसेची बॅनरबाजी

    अंबरनाथ मधील हुतात्मा चौकात राज ठाकरे दौऱ्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याचे एकत्र बॅनर दिसत आहेत. महाराष्ट्रात फक्त ठाकरेच .. अशा आशियाचे बॅनर लागले आहेत. बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.

  • 19 Sep 2025 08:40 AM (IST)

    शाळा गळतीमुळे 288 विद्यार्थ्यांना सुट्टी

    जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील भांबेरी येथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली असून मागील चार ते पाच दिवसा पूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे असावा उपस्थित झाल्यानंतर शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांना 2 दिवसाची सुट्टी देणे भाग पडले. शाळेची इमारत जुनी असल्याने आणि वर्ग खोल्यांचे छत खराब झाल्याने पावसाचे पाणी थेट वर्गात येत आहे तर 11 खोल्यांपैकी सात वर्ग खोल्यांमध्ये गळती देखील होऊन पाणी साचत आहे. या सगळ्या शाळा दुरुस्तीच्या प्रकाराकडे शिक्षण विभागाने मात्र कानाडोळा करून दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन शाळा दुरुस्तीकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करणार का याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले.

  • 19 Sep 2025 08:30 AM (IST)

    जालना जिल्ह्यातील 67 लघु मध्यम प्रकल्प पैकी 43 प्रकल्प ओव्हर फ्लो

    जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापासून जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून लघु मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ झाली. जिल्ह्यातील 67 पैकी जवळपास 43 प्रकल्प हे ओव्हरफ्लो झाले असून उपयुक्त पाणीसाठा आता 70 टक्क्यांवर गेला आहे त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे याच पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला असून अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • 19 Sep 2025 08:19 AM (IST)

    कांद्याला सरकारने त्वरित अनुदान देण्याची नाशिक जिल्ह्यातील खासदारांची मागणी

    कांद्याला सरकारने त्वरित अनुदान देण्याची नाशिक जिल्ह्यातील खासदारांनी मागणी केली आहे. गुजरातमध्ये कांद्याला अनुदान मिळतो त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील सरकारने त्वरित कांद्याला अनुदान द्यावे, अशी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मागणी केली.

  • 19 Sep 2025 08:08 AM (IST)

    कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात प्रेक्षकांचा गोंधळ!

    जिग्नेश भाई जोरदारचा प्रयोग इंटरव्हलला उपहारगृहात एक्सपायरी 20 रुपयाची बॉटल 30 रुपयांना विक्री करत असल्याने प्रेक्षक संतप्त झाले. याप्रकरणी पोलिसांनी जुना स्टॉक जप्त केला आहे.