Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : सोलापूरमध्ये कोणाचं पारडं जड, पाहा Video

सोलापूर लोकसभेत मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर या ६ विधानसभांचा समावेश येतो. यापैकी मोहोळमधून अजितदादा गटाचे यशवंत माने आमदार आहेत., सोलापूर उत्तरमधून भाजपचे विजयकुमार देशमुख, सोलापूर मध्य मधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, अक्कलकोटमधून भाजपचे सचिन शेट्टी, सोलापूर दक्षिणमधून भाजपचे सुभाष देशमुख, तर पंढरपुरात भाजपचेच समाधान आवताडे म्हणजे सोलापूर लोकसभेतल्या विधानसभांचं बलाबल हे महायुतीच्या बाजूला असूनही भाजपचा पराभव झाला.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : सोलापूरमध्ये कोणाचं पारडं जड, पाहा Video
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 12:02 AM

सोलापूर लोकसभेतल्या ६ विधानसभांपैकी सोलापूर उत्तर, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, अक्कलकोट या ४ ठिकाणी भाजपचे तर मोहोळमध्ये अजितदादा गटाचे यशवंत माने असे 5 आमदारांचं बळ महायुतीच्या बाजूला होतं. तर मविआच्या बाजूला एकट्या सोलापूर मध्यमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार होत्या. अजितदादा गटाचे आमदार यशवंत मानेंच्या मोहोळ विधानसभेतून काँग्रेसला 63 हजार 152 मतांचं लीड मिळालं. भाजप आमदार असलेल्या समाधान आवताडेंच्या पंढरपुरातून 45 हजार 420 चं लीड काँग्रेसला गेलं. भाजप आमदार सुभाष देशमुखांच्या सोलापूर दक्षिणमधूनही काँग्रेसला 9 हजार 436 ची आघाडी मिळाली भाजपच्या सचिन शेट्टींच्या अक्कलकोटमधून भाजपला 9 हजार 297 चं लीड मिळालं. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार असलेल्या सोलापूर मध्य मध्ये त्यांना अवघं 796 चं मताधिक्य राखता आलं. तर भाजप आमदार विजय देशमुखांच्या सोलापूर उत्तरमधून भाजपला 35 हजार 927 ची आघाडी मिळाली.

निकालावेळी काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना 6 लाख 20 हजार 225 मतं मिळाली. भाजपच्या राम सातपुतेंना 5 लाख 46 हजार 28 मतं. प्रणिती शिंदेंचा 74 लाख 197 मतांनी विजय झाला. 2019 ला सोलापूर लोकसभेत भाजपला 48.68 टक्के मतं मिळाली होती. यंदा 45.33 टक्के मतं मिळाली. गेल्यावेळी काँग्रेसची टक्केवारी 33.98 टक्के होती., यंदा मात्र 51.49 टक्के मतं मिळाली. म्हणजे भाजपच्या मतांच्या टक्केवारीत 3.35 टक्क्यांची घट झाली., तर काँग्रेसची मतं तब्बल 17.51 टक्क्यांनी वाढले.

2019 आणि 2024 च्या तुलनेत कुठे कुणाला लीड मिळालं. . 2019 ला मोहोळमध्ये काँग्रेसच्या सुशिलकुमार शिंदेंना 15 हजार 429 लीड होतं. यंदा मोहोळमधून प्रणिती शिंदेंना 63 हजार 152 मतांची आघाडी मिळाली. सोलापूर उत्तरमध्ये गेल्यावेळी भाजपच्या जयसिद्देश्वरांना 63 हजार 667 ची आघाडी होती. यंदा घट होवून राम सातपुते 35 हजार लीड घेवू शकले.

सोलापूर मध्य मध्ये जयसिद्धेश्वरांना 30 हजार 829 चं लीड होतं. यंदा प्रणिती शिंदेंना 796 मतांची आघाडी मिळाली. 2019 ला अक्कलकोटमधून भाजपच्या जयसिद्धेश्वरांना 47 हजार 429 लीड होतं. यंदा राम सातपुतेंना 9 हजार 297 चं मिळालं. सोलापूर दक्षिणमध्ये भाजपला 37 हजार 778 ची आघाडी होती. यंदा इथं प्रणिती शिंदे 9436 मतांनी पुढे राहिल्या. तर गेल्यावेळी पंढरपुरात सुशिलकुमार शिंदेंना 6196 ची आघाडी होती. यंदा प्रणिती शिंदेंनी तब्बल 45 हजार 420 मतांचं लीड घेतलं.

2019 च्या सोलापुरातल्या 6 विधानसभांमध्ये महायुतीत भाजपनं 4 तर शिवसेनेनं 2 जागा लढवल्या होत्या. आघाडीत राष्ट्रवादीनं ३ आणि काँग्रेस ३ जागी लढली. निकालानंतर भाजप 3 जागा जिंकली., शिवसेना शून्य….. राष्ट्रवादी 2 तर काँग्रेस एका जागेवर विजयी झाली होती. सोलापूर लोकसभेतल्या 6 विधानसभेत इच्छुकांपैकी सोलापूर शहर मध्य विधानसभेत महायुतीकडून भाजपचे देवेंद्र कोठे, शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे, अमोल शिंदे, मनिष काळजे मविआत माकपचे नरसय्या आडम, काँग्रेसचे चेतन नरोटे तर एमआयएमकडून फारुक शाब्दी इच्छूक आहेत.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा… महायुतीत भाजपकडून समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, शिंदे गटाकडून अनिल सावंत तर मविआत शरद पवार गटाकडून अभिजीत पाटील आणि काँग्रेसकडून भगीरथ भालकेंचं नाव काँग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून चर्चेत आहे.मोहोळ विधानसभेसाठी महायुतीत अजितदादा गटाचे यशवंत माने, शिंदे गटाचे नागन्नाथ क्षीरसागर,रमेश कदम, राजाभाऊ खरे. मविआकडून शरद पवार गटाचे संजय क्षीरसागरांचं नाव इच्छूक म्हणून चर्चेत आहे.

मोहोळ विधानसभेसाठी महायुतीत अजितदादा गटाचे यशवंत माने, शिंदे गटाचे नागन्नाथ क्षीरसागर,रमेश कदम, राजाभाऊ खरे. मविआकडून शरद पवार गटाचे संजय क्षीरसागरांचं नाव इच्छूक म्हणून चर्चेत आहे.

अक्कलकोट विधानसभेत महायुतीकडून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी, अनंत तानवडे, मविआत काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे आणि शितल म्हेत्रेंचं नाव चर्चेत आहे

सोलापूर शहर दक्षिण विधानसभा भाजपकडून सुभाष देशमुख, नरेंद्र काळे मविआत काँग्रेसचे दिलीप माने, सुरेश हासापुरे, बाबा मिस्री, महादेव कोगणुरे, ठाकरे गटाकडून अमर पाटील इच्छूक आहेत

सोलापूर शहर उत्तर विधानसभेसाठी महायुतीत भाजपकडून विजयकुमार देशमुख, मविआत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेश कोठे, नंदकुमार सपाटेंचं नाव चर्चेत आहे.

Non Stop LIVE Update
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.